Multilayer Farming: मल्टीलेअर फार्मिंग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, 25 लाखापर्यंत कमाई होणार; कसं ते जाणुन घ्या

Ajay Patil
Published:

Krushi News Marathi: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती करत आहे.

शेतकरी बांधव (Farmer) आता शेती व्यवसायात (Farming) वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू लागले आहेत. देशातील अनेक शेतकरी आता मातीविना शेती देखील करू लागले आहेत, म्हणजेच हायड्रोपोनिक (Hydroponics Technique) किंवा एरोपोनिक पद्धतीने शेती आता देशात होऊ लागली आहे.

शिवाय पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत आता शेतकरी बांधव नवीन नगदी पिकांची (Cash Crop) शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही (Farmers Income) वाढ होत आहे.

आज आपण देखील शेतीच्या एका विशिष्ट पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत. खरं पाहता ही पद्धत काही नवीन नाही, ही एक जुनी आणि शाश्वत उत्पन्न मिळवून देणारी पद्धत आहे.

मित्रांनो आम्ही ज्या शेतीच्या पद्धती बद्दल बोलत आहोत ती पद्धत आहे (Multilayer Farming) मल्टीलेअर फार्मिंग, याला आपण बहुपीक पद्धत असं देखील म्हणू शकतो.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया मल्टीलेअर फार्मिंग विषयी.अशा प्रकारे मल्टी लेअर फार्मिंग पद्धतीने शेती केली जातेमल्टीलेअर फार्मिंग करण्यासाठी शेतात मंडप बांधावा लागतो.

हा मंडप तयार करण्यासाठी बांबू आणि गवताची गरज आहे. मंडप बनवल्यानंतर शेतातील मातीची चाचणी केली जाते. यानंतर वेगवेगळ्या वेळी पिकांची लागवड आणि पेरणी केली जाते.

बहुस्तरीय लागवडीखाली एकदा तयार केल्यावर 5 वर्षे उत्पादन मिळते. शेतकऱ्याला सर्व माल बाहेरून विकत घ्यावा लागला तर मंडप तयार करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.

मात्र असे असले तरी दरवर्षी खर्च वजा जाता शेतकऱ्याला चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळतो. हा नफा पाच वर्षे येत राहतो. निश्चितच दीड लाख रुपये खर्च करून पाच वर्षात मल्टी लेअर फार्मिंग च्या माध्यमातून शेतकरी बांधव 25 लाख रुपयांपर्यंत कमाई सहजगत्या करू शकतो.

मल्टीलेअर फार्मिंग करण्याचे हे फायदे आहेत:- पिकांमध्ये कीटक कमी आढळतात.70 टक्के पाण्याची बचत होते.ही शेती करताना शेतकऱ्याचा खर्च कमी होतो.गारपीट, वादळ, सूर्यप्रकाश यांसारख्या हवामानाच्या परिणामांपासून पिकांचे संरक्षण होते.

लहान शेतकरी कमी खर्चात ही शेती करून जास्त नफा मिळवू शकतात.तण दुर्मिळ आहेत. त्यामुळे तण काढण्याचा खर्च वाचतो.या मॉडेल अंतर्गत वर्षभर उत्पन्न चालू राहते.दरवर्षी 4 ते 5 लाख रुपये कमवता येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe