अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नवी IDEA ! फळ शेती करून थेट…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या परंपरागत पिके, कायम येणारे नैसर्गिक संकटे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसताना देखील दिसून येत आहे.

भरपूर प्रमाणात खर्च करून देखील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळताना दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच कर्जबाजारीपणा वाढत असल्यामुळे विचित्र अशा विपरीत परिस्थितीत शेतकरी बंधू सापडलेले आहेत.

अनुषंगाने या परिस्थितीवर मात करण्यासाठी बरेच शेतकरी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकणाऱ्या पिकांचा शोध घेत असून त्याचाच एक भाग म्हणून फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर आता वाढली आहे.

फळबागा म्हटले म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पादन देऊ शकणारे शेती उत्पादन असून शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होताना दिसून येत आहे. त्याचे उदाहरण घेतले तर आपल्याला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून हे समजून घेता येईल. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकपद्धती बदललेली असून फळबागा लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे शेतकरी वळले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकपद्धतीमध्ये बदल करत डाळिंब, लिंबू तसेच पेरू व आंबा आणि द्राक्ष यासारख्या फळबागांच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर केल्या असून कमीत कमी पाणी आणि कमीत कमी मजुरीचा खर्च करून चांगले उत्पादन शेतकऱ्यांनी मिळवले असून त्यामुळे आर्थिक प्रगती सुधारण्यास मदत होत आहे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची 76,172 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली असून एक शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांना आता निर्माण झालेला आहे.

फळबागांमध्ये सर्वाधिक क्षेत्र आहे डाळिंबाचे

विविध प्रकारचे फळबागा खालील क्षेत्राचा विचार केला तर नगर जिल्ह्यात तब्बल 37 हजार 677 हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आलेली असून जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र डाळिंबाखालील आहे.

तसेच डाळिंबा नंतर लिंबू लागवड मोठ्या प्रमाणावर नगर जिल्ह्यात झाली असून बारा हजार एकरच्या पुढे क्षेत्र हे लिंबू लागवडीखाली आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तसेच जामखेड व श्रीगोंदा तालुक्यात लिंबू लागवड जास्त प्रमाणात झालेली आहे.

फळांचे विदेशात निर्यात करून मिळवत आहेत चांगले आर्थिक उत्पन्न

नगर जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष, पेरू आणि डाळिंब या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर असून या फळांचे निर्यात देखील करण्यात येते. निर्यातीच्या या व्यवसायातून वर्षभरात कोट्यावधींची उलाढाल होत असून या जिल्ह्यातील द्राक्षाला युरोप आणि दुबईमध्ये खास मागणी आहे.

त्यामुळे येणाऱ्या काही वर्षात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन कसे करता येईल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केलेले असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे. फळांच्या निर्यातीतून पैसा देखील चांगला मिळत असून त्यामुळे शेतकरी आता फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe