Pm Kisan Yojana: पीएम किसानचा 12वा हफ्ता लवकरचं, पण हे काम करा नाहीतर 2 हजार मिळणार नाहीत

Ajay Patil
Published:

Pm Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी भारत सरकार (Government) नेहमीचं वेगवेगळ्या योजना (Farmer Scheme) राबवत असते. 2014 मध्ये दिल्लीत सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना देशात लागू केल्या आहेत. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हाचं आहे.

मोदी सरकारने काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) ही शेतकरी हिताची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत सरकार दर वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मदत म्हणून देत असते. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे 6 हजार 2,000 रुपयाच्या एकूण तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते हस्तांतरित केले आहेत.

हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. राज्यातील सुमारे एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. आता मीडिया रिपोर्टनुसार, येत्या काही महिन्यांत सरकार 12व्या हप्त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे.

अशा स्थितीत विनाव्यत्यय हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काही महत्त्वाचे काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा त्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या महत्त्वपूर्ण माहिती विषयी.

मित्रांनो जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुमच्या खात्याचे ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही हे काम लवकरात लवकर करावे. सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख म्हणून 31 जुलै 2022 निश्चित केली आहे. अशा स्थितीत, मुदतीपूर्वी हे काम करणे आता या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेसाठी केवायसी केली नाही तर तुम्हाला 12 व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

योजनेत नोंदणी करताना अनेक वेळा शेतकरी त्यांच्या नावाचे स्पेलिंग चुकीचे टाकतात. जर अर्ज करताना चुकीचे नाव प्रविष्ट केले गेले असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

याशिवाय अनेक वेळा शेतकरी अर्ज करताना चुकीचा पत्ता टाकतात. तुम्ही ही चूक करू नये. असे केल्याने, तुम्हाला या योजनेचा निधी दिला जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा बारावा हफ्त्याचा पैसा देखील मिळणार नाही. यामुळे 12 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या पत्त्याचे तपशील लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अर्ज करताना तुम्ही तुमचा आधार कार्ड तपशील नक्की टाकला पाहिजे. चुकीचा आधार तपशील प्रविष्ट केल्यास तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe