पुणे तिथे काय उणे ! पुणे जिल्ह्याच्या नवयुवकाचा शेतीमध्ये अफलातून प्रयोग ; चक्क कंटेनर मध्ये सुरू केली केशर शेती, आता बनणार लखपती

Ajay Patil
Published:
pune successful farmer

Pune Successful Farmer : केशर एक महागड पीक म्हणून संपूर्ण जगात ओळखलं जातं. या पिकाची आपल्या भारतात केवळ काश्मीर या राज्यात लागवड पाहायला मिळते. मात्र आता या आधुनिक युगात केशर ची शेती काश्मिर व्यतिरिक्त इतर राज्यातही केली जात आहे.

अशा परिस्थितीत आपलं पुणे याबाबतीत कसं मागे राहिलं असतं. आपण नेहमीच म्हणत असतो पुणे तिथे काय उणे. आतापर्यंत पुण्यात केशरची उणीव होती, मात्र आता ही उणीव देखील पूर्ण झाली असून पुणे जिल्ह्यातील एका नवंयुवक तरुणाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केशर पिक पुण्यामध्ये उत्पादित करून दाखवले आहे.

यामुळे सध्या या नवयुवक तरुणाच्या अफलातून प्रयोगाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. शैलेश मोडक असे या तरुणाचं नाव असून या तरुणाने शेती-शिवारात नव्हे तर चक्क कंटेनर मध्ये केशरचे पीक उत्पादित करण्याची किमया साधली आहे. कंटेनर मध्ये पिकांची शेती करण्याच्या या पद्धतीला कंटेनर फार्मिंग म्हणून ओळखलं जातं.

खरं पाहता शैलेश हा मूळचा पुणेकर नसून नासिक मधील रहिवासी. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात स्थायिक झाला आहे. आता शैलेशने केशर चे पिक महाराष्ट्रासारख्या हवामानात तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादित करून दाखवले असल्याने याविषयी चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. केशर हे एक महागड अन्नपदार्थ म्हणून भारतात ओळखले जाते. याची किंमत सोन्यासमान असते. केशर किलोवर नाही तर ग्रॅम वर विकल जात.

एक ग्रॅम केशर ची किंमत 300 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत असते. मात्र असे असले तरी केशर पीक उत्पादित करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. याची उत्पादकता इतर पिकांच्या तुलनेत खूपच कमी असल्याने याला बाजारात सर्वाधिक दर मिळत असतो. कश्मीर, हिमाचल प्रदेश सारख्या थंड हवामान असलेल्या प्रदेशात या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते.

मात्र आता महाराष्ट्रसारख्या उष्ण हवामान असलेल्या भागात देखील केशरची तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करता येणे शक्य असल्याचे शैलेश मोडक यांनी दाखवून दिले आहे. कंटेनर फार्मिंगच्या मदतीने शैलेश यांनी पुण्यात केशरचे पीक उत्पादित करून दाखवले आहे. कंटेनर मध्ये एरोपोनिक टेक्निकचा वापर करत शैलेश यांनी गेल्या सहा वर्षांपासून केशरचे पीक उत्पादित करण्याचा प्रयोग राबवला आहे.

विशेष म्हणजे 320 स्क्वेअर फुट कंटेनर मध्ये केशर सोबत शैलेश यांनी इतर भाजीपाला पिकांची एरोपोनिक टेक्निकने लागवड केली आहे. खरं पाहता शैलेश यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काश्मीर मधून बारा किलोचे केशरकंद मागवले. यानंतर कंटेनर मध्ये शैलेश यांनी तापमान नियंत्रित करून केशर चे पीक घेतले. कंटेनरमध्ये हे पीक वाढू लागल्यानंतर शैलेश यांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा काश्मीर कडे वळवला. ते काही दिवस राहून त्यांनी केशर लागवडीची पद्धत समजून घेतली.

मग कंटेनर मध्ये केशर लागवड सुरू झाली. केशर व्यवस्थित रित्या वाढावे आणि त्याला योग्य तापमान मिळावे या अनुषंगाने कंटेनरमध्ये एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी, डीह्युमिडिफायर, आद्रता कमी – जास्त करण्याकरता चारकोल वर आधारीत तंत्र अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रकाश संश्लेषण देखील कृत्रिम पद्धतीने केशर पिकाला पुरवले जात आहे. शैलेश यांनी पुण्यातील वारजे परिसरात हा कंटेनर विकसित केला आहे.

एका ट्रेमध्ये सुमारे 400 ते 600 केशर कंद शैलेश विकसित करत आहेत. शैलेश त्यांच्या कंटेनर मध्ये 500 किलो केशर कंदाची वाढ करत असून त्यापासून त्यांना सव्वा किलो केशर उत्पादित होणे अपेक्षित आहे. किलोला सहा लाख 23 हजार 750 एवढा बाजार भाव केशरला मिळत असून शैलेश यांना देखील या आधुनिक केशर शेतीतून लाखो रुपयांची कमाई होणार आहे.

शैलेश यांना आत्तापर्यंत म्हणजेच कंटेनर विकसित करण्यापासून ते आत्तापर्यंत आठ लाखांचा खर्च आला आहे. निश्चितच यातून यावर्षी उत्पादन खर्च वसूल होणार आहे. यापुढे केशर शेतीतुन चांगल उत्पन्न त्यांना मिळणार आहे. निश्चितच पुण्याच्या या नवयुवकाचा हा अफलातून प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरला आहे.

केशर म्हटल्यानंतर सर्वप्रथम काश्मीर हेच नाव आपल्या डोळ्यासमोर फिरत असते. मात्र आता परिस्थिती बदलली असून आधुनिकीकरणाच्या या युगात केशरचे पीक महाराष्ट्रात देखील उत्पादित केले जाऊ शकते हे शैलेश यांनी दाखवून दिले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe