Crop Loan:- शेती क्षेत्रासाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे असते. कारण बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारभावातील घसरण इत्यादीमुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल पिकवला तरी देखील पुरेसा पैसा हातात येत नाही किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो.
अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या तयारी करण्यासाठी पैसा शिल्लक राहत नाही व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर पैसा उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून पिक कर्ज ही खूप मोठी उपलब्धी समजली जाते.
परंतु बऱ्याचदा बँकांच्या माध्यमातून दिले जाणारे पीक कर्ज देखील वेळेवर शेतकऱ्यांना मिळत नाही व या कर्जासाठी देखील तारण ठेवावे लागते. या प्रकारच्या अनेक समस्या शेतीसाठी पैसा उभा करताना शेतकऱ्यांसमोर येतात.
परंतु आता याबाबतीत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली असून शेतकऱ्यांना आता एक लाख साठ हजार रुपये नाहीतर तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत को – लॅटरल फ्री कर्ज म्हणजेच कुठलीही तारण न ठेवता कर्ज मिळू शकणार आहे.
शेतकऱ्यांना मिळेल दोन लाखापर्यंत तारण मुक्त कर्ज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्व बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यात आली असून शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत व्हावी याकरिता शेतकऱ्यांसाठी को लेटरल फ्री कर्जाची मर्यादा 40000 रुपयांनी वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे अगोदर शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपये इतके कर्ज कुठलेही तारण न ठेवता मिळत होते.
आता त्यात 40,000 रुपयांची वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना आता काहीही तारण न ठेवता बिनधास्त दोन लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे.
अशा पद्धतीने शेतकऱ्यांना योग्य भांडवल योग्य वेळेला मिळणे खूप गरजेचे होते व ते ही कुठलेही कागदपत्र न दाखवता व त्या दृष्टिकोनातून हा निर्णय खूप फायद्याचा ठरणार आहे.
बऱ्याचदा शेतकऱ्यांकडे बँकेत गहाण ठेवण्यासाठी देखील काही नसते व त्यावेळी त्यांना कर्ज मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने शेतकऱ्यांसाठी को लॅटरल कर्ज योजना सुरू केली आहे.
व्याजदरात मिळेल सूट
तसेच शेतकऱ्यांना हे तारण न ठेवता म्हणजेच को लॅटरल फ्री कर्ज देत असताना त्यामध्ये व्याजदरात देखील सूट देण्यात आलेली आहे. या कर्जावर सात टक्के इतके व्याज आकारण्यात येते.
परंतु शेतकऱ्यांनी जर वेळेपूर्वी कर्ज फेडले तर बँक शेतकऱ्यांना तीन टक्के यामध्ये अनुदान देईल व अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सात नाही तर फक्त चार टक्के इतके दराने व्याज भरावे लागेल.