शेती आणि शेती संबंधित उद्योगधंदांमधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळत असते. जसे औद्योगिक क्षेत्रातून किंवा इतर व्यवसायातून लोकांना उत्पन्न मिळते त्यातून त्यांना शासकीय नियमानुसार आयकर भरणे गरजेचे असते. परंतु शेती व शेती संबंधित इतर बाबींपासून शेतकऱ्यांना जे काही उत्पादन मिळते त्यावर आयकर आकारला जातो का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
जर आपण इन्कम टॅक्स संदर्भात विचार केला तर नेमकी शेती उत्पादनाची व्याख्या नेमकी काय किंवा कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव शेती उत्पादनामध्ये होतो हा फॅक्टर या ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. याच मुद्द्याला पकडून आयकर कायद्यांमध्ये विशिष्ट अशा तरतुदी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित उत्पन्नावर कर लागेल की नाही हे निश्चित केले जाते. त्यामुळे याबाबतीत आपण महत्त्वाची माहिती या लेखात घेऊ.
शेती उत्पादनाच्या बाबतीत महत्त्वाच्या बाबी
शेती उत्पादनाचा विचार केला तर विक्रीचा व्यवसाय म्हणून याची गणना होत नाही. यामध्ये शेती करिता जर जमीन इतर व्यक्तीला भाड्याने दिले असेल तर त्याची शेतीतून मिळणाऱ्या आर्थिक उत्पादनाचा अंतर्भाव केला जाईल. म्हणजेच फार्म हाऊस भाड्याने दिले असेल तर त्यावर हाऊस प्रॉपर्टी म्हणून कर लागतो. समजा जमिनीची विक्री केली आणि ती जमीन आयकर नियमानुसार शेतजमीन असेल तर त्यावर कॅपिटल गेन लागत नाही.
परंतु जर विक्री केलेली जमीन शेतजमीन नसेल तर त्यावर कॅपिटल गेन लागतो. शेतीमधून जे काही उत्पादन मिळते त्याची विक्री केल्यानंतर शेती करिता जो काही खर्च होतो त्याची वजावट मिळते. जर करदात्याला शेतीतूनच उत्पन्न मिळत असेल तर ते संपूर्ण करमुक्त असते. परंतु जर शेतीपासून मिळणारे उत्पादन सोडून इतर उत्पन्न त्याला मिळत असेल व ते बेसिक जी काही मर्यादा आहे त्याच्यावर असेल आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न पाच हजाराच्या वर असेल तर शेती उत्पन्नावरही कर लागतो.
याकरिता शेती संबंधित असलेले जे काही हिशोबाची वही खाते आहे ते करदात्यानी आपल्या इतर व्यवसायांपासून वेगळे ठेवणे गरजेचे आहे. शेतजमिनीचे सर्व कागदपत्रे करदात्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. तसेच वर्षानुसार शेतीत लागवड केलेल्या पिकांची माहिती देखील ठेवली पाहिजे. महत्वाचे म्हणजे शेतीत होणारा खर्च आणि माल विक्री केल्याच्या पोचपावत्या देखील व्यवस्थित सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारण्यात येत नाही अशी एक समजूत आहे परंतु आयकर कायद्यानुसार अनेक तरतुदी आहेत ज्यामधून शेतीतून होणाऱ्या उत्पन्नावर देखील कर आकारणी करता येऊ शकते. त्यामुळे आता शेतीत जे काही ड्रोन किंवा अन्य तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे त्यामुळे करदात्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढत आहे का किंवा मिळत आहे का याची देखील पडताळणी आयकर विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.