अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील शेतकऱ्याला तब्बल ४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने कोरोनाकाळात बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील राहुल कान्होरे यांची शेतजमीन आहे. कोथंबीर या पिकातुन कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळत असल्याने
कान्होरे यांनी पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन एकर क्षेत्रावर व दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोथंबिरीची लागवड केली लागवडीनंतर साधारणत ४० दिवसांनी कोथिंबीर परिपक्व झाली.
त्यांना ३५ हजार रुपयांच्या आसपास लागवडीपासून काढणीपर्यंत खर्च आला. ही कोथिंबीर मार्केटला न नेता जागेवरच व्यापाय्राला विक्रीचा निर्णय घेत तब्बल चार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
लाँकडाऊन व कोरोनाच्या काळात खर्चवजा जाता शेतकयाला चांगले उत्पन्न झाल्याने परिसरातील शेतकय्रांमधे समाधानाचे वातावरण आहे व शेतकय्रांची येनारी दिवाळी ही गोड होईल येवढ मात्र नक्कीच.
पहा व्हिडीओ
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम