नाशिक जिल्ह्यातील तळेगावात बेदाण्याची यशस्वी लागवड! खर्च वजा जाता शेतकऱ्यांना मिळेल 4 ते 5 लाखाचे उत्पन्न

नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून नाशिक जिल्ह्याला द्राक्षांचे आगार म्हणून देखील ओळखले जाते. द्राक्षांवर प्रक्रिया करणारे उद्योग तसेच वेगवेगळ्या व्हरायटींचे द्राक्ष उत्पादन आपल्याला नाशिक जिल्ह्यातून पाहायला मिळते.

Published on -

Raisin Cultivation:- नाशिक जिल्हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून नाशिक जिल्ह्याला द्राक्षांचे आगार म्हणून देखील ओळखले जाते. द्राक्षांवर प्रक्रिया करणारे उद्योग तसेच वेगवेगळ्या व्हरायटींचे द्राक्ष उत्पादन आपल्याला नाशिक जिल्ह्यातून पाहायला मिळते.

द्राक्ष शेतीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अतिशय प्रयोगशील असून कायमच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून भरगोस उत्पादन घेण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्या अनुषंगाने आता द्राक्षाची पंढरी असलेल्या याच नाशिक जिल्ह्यातून बेदाणे निर्मितीने वेग पकडला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा किंवा आर्थिक दृष्टीने शेतकरी समृद्धी होत आहेत.

बेदाण्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या तळेगाव येथे बेदाण्याचे यशस्वीपणे उत्पादन घेण्यात आले असून तीन वर्षांपूर्वी ट्रायल प्लांट म्हणून घेतलेल्या वीस गुंठे क्षेत्रावर बेदाण्याची यशस्वी लागवड करण्यात आली होती व हा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे.

नाशिक जिल्ह्यात यशस्वी केली बेदाण्याची लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, द्राक्षाचे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या तळेगाव या ठिकाणी बेदाण्याचे यशस्वीपणे उत्पादन घेण्यात आले असून तीन वर्षांपूर्वी ट्रायल प्लांट म्हणून 20 गुंठे क्षेत्रावर बेदाण्याची यशस्वी लागवड करण्यात आलेली होती व यापासून आता यशस्वीपणे उत्पादन देखील मिळाले आहे.

भारताचा जर विचार केला तर भारतीयांना खास करून अफगाणिस्तान येथून जो काही बेदाणा आयात केला जातो त्यावर अवलंबून राहावे लागत होते. परंतु आता भारतीयांना अफगाणिस्तानातून आयात करण्यात येणाऱ्या बेदाण्यापेक्षा उच्च प्रतीचे बी व गोडवा असलेले सुगंधी काळे बेदाणे चाखायला मिळणार आहेत.

या ठिकाणाच्या द्राक्ष बागायतदार संघाने एक वर्षांमध्ये एक हजार सहाशे किलो द्राक्षाच्या उत्पादनातून 500 किलो उच्च प्रतीचा बेदाणा तयार केला. त्यामधील द्राक्षामध्ये साखरेचे 25 ते 27 टक्के प्रमाण आढळून आलेले आहे.

आगरकर इन्स्टिट्यूट, पुणे येथील संस्थेने तयार केली व्हरायटी
पुणे येथील आगरकर इन्स्टिट्यूट या संस्थेने आरोमा म्हणजे सुगंध असलेला एच 516 ही बी असलेली काळ्या रंगाची व्हरायटी तयार केली होती व त्या व्हरायटीची महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील फार्मवर तीन वर्षांपूर्वी यशस्वी लागवड केली होती व हा प्रयोग आता यशस्वी झाला आहे.

सुगंधी अरोमा काळे द्राक्ष एच 516 या व्हरायटीच्या साडेतीन किलो द्राक्ष पासून एक किलो बेदाणा तयार होतो व जवळपास होलसेल रेटने 305 रुपये किलो या दराने विकला जातो. एकरी 10 ते 12 टन यापासून उत्पादन होते व तीन ते साडेतीन टन बेदाणा तयार होतो. म्हणजेच खर्च वजा जाता शेतकऱ्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न या माध्यमातून मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News