Successful Farmer: सध्या देशातील नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेती व्यवसायात (Farming) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. मात्र शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल केला आणि योग्य नियोजनाची सांगड घातली तर निश्चितच शेतीमधून लाखो रुपयांची कमाई (Farmers Income) केली जाऊ शकते.
यासाठी मात्र शेतकरी बांधवांना बदल स्वीकारावा लागणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) एका नवयुवक शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात नावीन्यपूर्ण बदल घडवून लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे.

जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्याच्या मौजे तामलवाडी येथील दादाराव पाटील यांनी फुलशेतीच्या (Floriculrture) माध्यमातून अवघ्या 80 गुंठे क्षेत्रातून तीन महिन्याच्या कालावधीत पाच लाख रुपये कमावण्याची किमया साधली आहे. दादाराव यांनी मिळवलेल्या या यशामुळे सध्या त्यांची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे.
मित्रांनो दादाराव कोरोनाच्या काळात शेतीकडे वळले. या निर्णयामुळे दादाराव यांचा मोठा फायदा झाला आहे. त्यांनी मार्च महिन्यात झेंडूच्या फुलांची लागवड (Marigold Farming) केली. ऐन उन्हाळ्यात दादाराव यांनी 80 गुंठे जमिनीत जवळपास 14000 झेंडू रोपांची लागवड केली. झेंडू लागवड केल्यानंतर पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्याने दादाराव यांना झेंडूच्या शेतीतून तीन महिन्यातच पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
झेंडू लागवड केल्यानंतर दादा राव यांनी ठिबक सिंचन प्रणालीचा माध्यमातून पिकाला पाणी देऊ केले. झेंडू शेती साठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत दादाराव यांना सुमारे 60 हजार रुपये खर्च आला. झेंडूच्या फुलांना 80 रुपये प्रति किलो दराने भाव मिळाला यामुळे झेंडूची शेती दादाराव यांना फायद्याची ठरले.
दादाराव झेंडूच्या पिकातून रोजाना दोन क्विंटल फुले बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत होते. अशा पद्धतीने दादाराव यांना झेंडूच्या शेतीतून अवघ्या तीन महिन्यांत पाच लाखांची कमाई झाली. यामुळे सध्या दादाराव यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
दादाराव यांच्या गावापासून मोजून 20 किलोमीटर अंतरावर बाजारपेठ उपलब्ध असल्याने दादाराव यांना याचा फायदा झाला. दादाराव यांनी झेंडूच्या शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमवून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे. शेती व्यवसायात जर काळाच्या ओघात आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल केला शिवाय त्याला आधुनिकतेची सांगड घातली तर निश्चितच लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते हे दादाराव यांनी दाखवून दिले आहे.