Successful Farmer: भावा फक्त तूच रे…! ऊस शेतीला राम दिला, सुरु केली ड्रॅगन फ्रुटची शेती, एकाच एकरात 8 लाखांची झाली कमाई

Ajay Patil
Published:

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करू लागले आहेत. विशेष म्हणजे फळबाग शेती (Agriculture) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. आता ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) या विदेशी समजल्या जाणाऱ्या फळाची देखील मोठ्या प्रमाणात आपल्या देशात शेती (Dragon Fruit Farming) केली जात आहे.

उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांनी देखील आता ऊस शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रुट लागवडीला अधिक प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून ऊस शेतीपेक्षा कितीतरी अधिक पटीने ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून शेतकरी नफा कमवत आहेत.

मेरठमधील प्रगतीशील शेतकरी सचिन चौधरी यांनी देखील पिढ्यानपिढ्या सुरु असलेली उसाची शेती सोडून ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू केली आहे. मावणा परिसरातील एका गावात सचिनने ही शेती सुरू केली आहे. सचिन सांगतो की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याने गुजरातमधून 1600 रोपे आणली आणि एका एकरात लावली.

यासाठी एक एकरात 400 खांब उभारण्यात आले असून प्रत्येक खांबावर निवडुंगाच्या वेलीप्रमाणे चार रोपे लावण्यात आली आहेत. त्यावर आता ड्रॅगन फ्रुटची झाडे वाढू लागली असून, ड्रॅगन फ्रूटही त्यांना लवकरच लागणार आहेत. यामुळे अवघ्या काही दिवसात सचिन यांना ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून चांगले बक्कळ उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

मेरठमधील प्रयोगशील शेतकरी सचिनने सांगितले की, एक एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च आला आहे. किरकोळ बाजारात ड्रॅगन फ्रूटच्या एका नगची किंमत 200 ते 250 रुपयांपर्यंत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत फळे येतात. ड्रॅगन फ्रूट प्लांटचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असते. सचिन सांगतो की, पाचव्या वर्षापासून त्याला वर्षाला सुमारे आठ लाख रुपये कमावण्याची आशा आहे. निश्चितच ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन सुरू होईल तेव्हा सचिन यांना याच्या शेतीतून चांगला बक्कळ फायदा राहणार आहे.

ठिबक सिंचनाचा अवलंब करून पाण्याची बचत

त्याचवेळी पाण्याची घसरलेली पातळी पाहता सचिनने पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजनाही केल्या आहेत. सचिन चौधरी यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेतात सिंचनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. यामुळे पाण्याची बचत तर होईलच पण विजेचीही बचत होईल. ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन झाल्यानंतर दिल्लीतील गाझीपूर मंडईसह मोठ्या मंडईत जाऊन ते फळ विकणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे.

उत्पन्नात मोठी वाढ होईल

ड्रॅगन फ्रूटची लागवड आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. शासनाकडून प्रोत्साहन म्हणून फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानही दिले जात आहे. फळबाजारात ड्रॅगन फ्रूटची विक्री खूप महाग आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. निश्चितच ड्रॅगन फ्रुट ची शेती शेतकऱ्यांना मालामाल बनवून सोडणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe