भावा वावर है तो पॉवर है..! पट्ठ्याने अर्ध्या एकरात भोपळा लागवड केली, अवघ्या काही दिवसात दिड लाखांची कमाई झाली

Ajay Patil
Published:

Successful Farmer: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशात बहुतांशी शेतकर्‍यांकडे (Farmer) खूपच कमी शेतजमीन आहे. अशा परिस्थितीत अनेक अल्पभूधारक शेतकरी (Small Farmer) कमी शेतजमीन असल्यामुळे चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळत नसल्याच्या तक्रारी करत असतात.

मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखले तर कमी शेतजमीनीतून देखील लाखों रुपयांची कमाई केली जाऊ शकते. देशात असे अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत जे की आपल्या मोजक्या जमिनीतून लाखो रुपयांची कमाई करून, कमी शेतजमीन असल्यामुळे कमाई कमी होते असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आरसा दाखवण्याचं काम करत आहेत.

हरियाणा मधील एका शेतकऱ्याने देखील आपल्या अर्ध्या एकर शेतजमीनीत भोपळा (Pumpkin Crop) या भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable Crop) लागवड करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. या शेतकऱ्याने कमी दिवसात आणि कमी जमिनीतून लाखों रुपये उत्पन्न कमावले असल्याने या शेतकऱ्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

हरियाणा राज्यातील कनिना भागातील मौजे कोटीया गावातील रहिवाशी शेतकरी हजारीलाल यांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रात भाजीपाला लागवड करण्याचा बेत आखला. या अनुषंगाने त्यांनी भोपळा या भाजीपाला पिकाची निवड केली. या पिकाच्या लागवडीसाठी (Pumpkin Farming) त्यांना 15 हजार रुपयांचा खर्च आला.

अर्धा एकरात पंधरा हजार रुपये खर्च करून भोपळा लागवड केली गेली आणि अवघ्या काही दिवसात या भोपळा शेतीतून त्यांना दीड लाख रुपयांची कमाई झाली. हजारीलाल यांनी उत्पादित केलेल्या भोपळ्याची गुणवत्ता चांगली असल्याने भोपळा विक्री करण्यासाठी त्यांना कुठेही धडपड करण्याची आवश्यकता भासली नाही.

व्यापाऱ्यांनी हजारीलाल यांच्या बांधावर हजेरी लावत भोपळा खरेदी केली आहे. यामुळे या शेतकऱ्याचा वाहतुकीचा खर्च वाचला असून होणारी मेहनत देखील वाचली आहे. हजारीलाल यांनी अर्धा एकर क्षेत्रात लावलेल्या भोपळा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी शेणखताचा वापर केला आहे. यामुळे त्यांना भोपळ्याचे चांगले दर्जेदार पिक मिळाले आहे.

हजारीलाल यांनी एप्रिल मध्ये भोपळा लागवड करण्याचे नियोजन आखले यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या अर्धा एकर शेत जमिनीत नांगरणी केली. खोल नांगरणी केल्यानंतर चांगल्या दर्जाचे जुने कुजलेले शेणखत जमिनीत टाकले गेले आणि त्यानंतर एप्रिलच्या शेवटी भोपळ्याची लागवड केली गेली.

भोपळा लागवड करण्यासाठी अर्धा एकर शेत जमिनीत 35 बेड तयार करण्यात आले. या 35 बेडमध्ये सुमारे 300 ग्रॅम भोपळा बियाणे वापरून पेरणी करण्यात आली. हजारीलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या अर्धा एकर क्षेत्रातून त्यांना दिवसाकाठी दीडशे किलो भोपळा मिळत आहे याची बाजारात किंमत 35 ते 40 रुपये प्रति किलो अशी आहे. म्हणजेच हजारीलाल यांना दिवसाकाठी सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

आतापर्यंत त्यांना दीड लाख रुपयांची कमाई यातून झाली आहे. हजारीलाल यांच्या मते भोपळा हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर त्या जमिनीत गाजर किंवा मुळा या पिकाची शेती केली जाणार आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील पिकचक्रात बदल करण्याच्या हेतूने भोपळा हार्वेस्टिंग नंतर इतर पिकांची शेती करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे. निश्चितच कमी शेतजमिनीत विशेष म्हणजे भाजीपाला पिकातून लाखो रुपये उत्पन्न कमवून हजारीलाल यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe