Sugarcane Farming : ऊसावर पडला हा रोग ! ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत

Published on -

Sugarcane Farming : सध्या उसावर फैलाव दिसून येत आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी, साकेगाव, सुसरे परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

आपले ऊस पिक वाचविण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सध्या उसावर या रोगाची सुरुवात झाली असून यामध्ये आधी उसाच्या पानांवर परिणाम होऊन ती आकुंचन पावतात व त्यावर डागही दिसून येतात. रोगग्रस्त पाने गळून काळी पडतात. त्यातून उसाची वाढ खुंटते.

पोक्का बोईंग रोगाची दुसरी अवस्था घातक असते. यामध्ये उसावरील सर्व पाने गळून पडतात व उसाचा शेंडा खराब होतो. याची तिसरी अवस्था नाइफ कट असते. त्यामध्ये शेंड्याकडील भागावर घाव दिसून येतात. शेतकऱ्यांनी सुरुवातीची लक्षणे दिसून आल्यावर उसाची कायम पाहणी करावी.

प्राथमिक अवस्थेत दिसून आलेल्या पोक्का बोईंग रोगावर कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के, डब्ल्यूपी ०.२ टक्के (अर्थात एक लिटर पाण्यात २ ग्रॅम औषध ) अथवा कार्बेडेझीम ५० टक्के, डब्ल्यूपी ०.१ टक्के पंधरा दिवसांच्या अंतराने फवारावे. या नियमित फवारणीने पिकाचे नुकसान रोखले जाऊ शकते, असे कृषितज्ज्ञ अनिल देशमुख यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe