EPFO Update: कोट्यावधी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे गिफ्ट! पीएफ ठेवीवरील व्याजदरात केली ‘इतकी’ वाढ, महागाई भत्त्याचं काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EPFO Update:-  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली असून त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पीएफ मधील ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यासंबंधीचा ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता कोट्यावधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.

 सरकारने पीएफ व्याजदरात केली इतकी वाढ

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ ठेवी वरील व्याज दारात वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाला पाठवला होता व तो प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाने स्वीकारला असून त्यानुसार आता आर्थिक वर्ष 2023 साठी पीएफ वर 8.15 टक्के व्याजदर मंजूर करण्यात आलेला आहे.

याचाच अर्थ आता 2022-23 या आर्थिक वर्षात पीएफ खातेदाराला 8.15 टक्के दराने ठेवीवर व्याज मिळणार आहे. अगोदर हा व्याजदर 8.10% होता. म्हणजेच आता यावेळी सरकारने यामध्ये पाच पॉईंट ची वाढ केली आहे. एवढेच नाही तर याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक नोटिफिकेशन देखील जारी केले असून या नोटिफिकेशन मध्ये  म्हटले आहे की,

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफ योजनेतील प्रत्येक सदस्याच्या खात्यात 2022-23 वर्षासाठीचे व्याज जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 चा पॅरा 60(1) अंतर्गत देखील केंद्र सरकारने आता मंजुरी दिलेली आहे. साधारणपणे हे व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात ऑगस्ट 2023 पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.

 सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांची दुसरी महागाई भत्ता वाढ लवकरच दिली जाण्याची शक्यता

तसेच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारकडून एक महत्वाचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना दिले जाण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच दुसरी वाढ केली जाण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात येत असून याबाबत देखील आता कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांची पगार देखील वाढेल हे मात्र निश्चित. साधारणपणे केंद्र सरकारचे देशातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना  ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ही आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

याबाबतची मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आता महागाई भत्ता वाढ तसेच महागाई भत्त्याची थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर वर देखील एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून  याचा नक्कीच फायदा हा कर्मचाऱ्यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी असलेला यावर्षीचा पहिला महागाई भत्ता हा मार्च 2023 मध्ये वाढविण्यात आला होता.

परंतु यामध्ये जरा उशीर झाला. परंतु झालेली ही वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून लागू केली जाणार आहे. तसेच दुसरी महागाई भत्त्यातील वाढ ही या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यामध्ये होण्याची शक्यता असून परंतु अजून देखील त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही.

परंतु ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून आता चार टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% इतका होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.