Dairy Business Success Story:- महिला म्हटले म्हणजे आता फक्त चूल आणि मूल या पुरतीच मर्यादित राहिली नसून आज महिलांचे जग खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रांमध्ये आता महिला आघाडीवर असून पुरुषांच्या बरोबर नव्हे तर पुरुषांच्या एक पाऊल पुढे काम करताना आपल्याला दिसून येत आहेत.
सध्या भारतातील कुठलेही असे क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला नाहीत. अगदी देशाचे संरक्षण क्षेत्र असो किंवा उद्योग किंवा सेवा क्षेत्र असो अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत व याला कृषी क्षेत्र देखील अपवाद नाही. आपण भरपूर महिलांच्या यशोगाथा पाहतो किंवा ऐकतो की कृषी क्षेत्रामध्ये महिलांनी अनन्यसाधारण अशी प्रगती केलेली आहे.
अगदी याच अनुषंगाने जर आपण हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील रेणू सांगवान या महिला शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर ती या मुद्द्याला बिलकुल साजेशी आहे. रेणू सांगवान यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती केली आहे.
रेणू सांगवान यांची यशोगाथा
हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यात असलेल्या खरमान या गावच्या रहिवासी असलेल्या रेणू सांगवान यांनी साधारणपणे 2017 मध्ये दूध व्यवसाय करायचा निर्णय घेतला व सुरुवातीला फक्त नऊ गायी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने या व्यवसायात वाढ करत आज त्यांच्याकडे जवळपास 240 पेक्षा अधिक गायी गोठ्यात आहेत.
या सगळ्या व्यवसायातून वार्षिक कोट्यावधी रुपयांची कमाई रेणू सांगवान करत असून दुग्धव्यवसायामध्ये त्यांनी एक अनन्यसाधारण अशी प्रगती केली आहे. नऊ गाईंपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अवघ्या सात ते आठ वर्षांमध्ये 240 गाईपर्यंत पोहोचला हे याच्यामध्ये कौतुक करण्यासारखे आहे.
त्यांनी प्रामुख्याने देशी गाई व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दूध व्यवसायामध्ये किमया साधली आहे. या सगळ्या दूध व्यवसायाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित देखील करण्यात आलेली आहे.
प्रचंड कष्ट आणि व्यवस्थित नियोजनाने त्यांनी हा व्यवसाय वाढवला असून एक आदर्शवत डेरी फार्म देखील सुरू केला आहे व या डेअरी फार्मला गोकुल फार्म श्रीकृष्ण गोधाम असे नाव दिले आहे. ते नुसते दूध विक्रीच करत नाही तर दुधापासून तूप, बर्फी तसेच पनीर व च्यवनप्राश यासारख्या दुधावर प्रक्रिया करून उत्पादनाची देखील निर्मिती करतात व त्यांच्या विक्रीतून त्यांना मोठा नफा मिळतो.
त्यांच्या सगळ्या दूध व्यवसायामागील यशाचे गमक जर बघितले तर ते म्हणजे देशी गाईंचे पालन व या व्यवसायामधील आलेले आधुनिक तंत्रज्ञान व त्या तंत्रज्ञानाचा कौशल्य पूर्ण रीतीने केलेला वापर याचा मोठा फायदा त्यांना झालेला आहे.
आज त्यांची कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये आहे.प्रचंड प्रमाणात कष्ट आणि व्यवसायातील नियोजन याच्या जोरावर रेणू सांगवान यांनी हे यश मिळवले व त्यांनी मिळवलेले यश नक्कीच इतर महिला शेतकरी व इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणादायी आहे हे मात्र निश्चित