Tur Farming: भारतात शेती (Farming) ही तिन्ही हंगामात केली जाते. खरीप (Kharif Season) म्हणजेच पावसाळी हंगाम, रब्बी हंगाम तसेच उन्हाळी हंगाम या हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करत असतात. मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम सुरु आहे.
या हंगामातील बहुतांश पिकांची पेरणी व लावणीची कामे देशातील अनेक राज्यात पूर्ण झाली आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांनी (Farmer) देखील खरीप हंगामातील पेरणीची कामे कधीच पूर्ण केली आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी तूर पेरणी (Tur Cultivation) आगात केली होती, त्यांनी पिकावर अधिक देखरेख करणे आवश्यक आहे, कारण या काळात पीक सुरुवातीच्या अवस्थेत असते. मित्रांनो पाऊस पडल्यानंतर शेतात तणांसह किडी व रोगांचा प्रादुर्भावही वाढतो. अशा स्थितीत पिकामध्ये वेळेवर व्यवस्थापनाचे काम होणे गरजेचे आहे.
तूर पिकाच्या (Tur Crop) चांगल्या विकासासाठी सकाळ संध्याकाळ निरीक्षण करणे व तण काढण्याचे काम करावे लागणार आहे. चला तर मग मित्रांनो तूर पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी कोणते व्यवस्थापन करावे लागेल याविषयी आपण जाणून घेऊया.
तूर पिकातील तण व्यवस्थापन
- अनेकदा असे दिसून येते की 25 ते 30 दिवसांनी तूर पिकासह तणही वाढतात, जे पिकांचे पोषण शोषून घेतात आणि सुरुवातीला झाडे कमकुवत होतात.
- अशा स्थितीत पेरणीनंतर शेतात हेक्टरी 1 ते 1.5 किलो पेंडीमेथालिनची फवारणी करावी.
- शेतकऱ्याची इच्छा असल्यास, उगवण झाल्यानंतरच, पेरणीनंतर 20 दिवसांनी 1.25 किलो कुझालोपॅप पी. इथाल किंवा 1 किलो इमाझाथापर पिकावर फवारणी केली जाऊ शकते.
- पिकामध्ये वेळोवेळी हाताने तण काढत राहा, त्यामुळे पिकाच्या मुळांमध्ये ऑक्सिजनचा संचार वाढतो आणि तणांचाही नाश होतो.
- तण काढण्याबरोबरच तूर पिकाच्या संरक्षणासाठी व वाढीसाठी जीवामृत फवारावे.
- ज्या शेतकऱ्यांनी शेत तयार करताना युरियाचा वापर केला होता, त्यांनी युरियाचा दुसरा डोस पिकावर 30 ते 35 दिवसांत पसरवावा.
शेतातील ड्रेनेज सिस्टम
तुरीच्या अनेक जाती जास्त पाणी सहन करतात, परंतु पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेतात ओलावा निर्माण करूनच काम केले जाते. अशा स्थितीत पावसाचे पाणी शेतात तुंबून पीक खराब होऊ नये, यासाठी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. यासाठी 15 ते 20 मीटर अंतरावर नाले तयार करावेत, जे थेट शेतातून बाहेर पडतात.
रोग आणि कीटक नियंत्रण
- यावेळी तूर हे पीक लहान व नाजूक असते. अशा स्थितीत पिकावर लक्ष ठेवा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करा.
- पिकामध्ये कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर सेंद्रिय कीड नियंत्रणाचे काम करा.
- शेतकर्यांना हवे असल्यास ते कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचे कीटकनाशक पाण्यात मिसळून ते पिकावर एकदा फवारू शकतात, त्यामुळे पावसामुळे पिकावर वाढणारे बुरशीजन्य रोग व विषाणू नष्ट होतात.