Poultry Farming: कमी खर्चात सुरू करा स्वतःचा पोल्ट्री फार्म आणि पाळा ‘ही’ सोन्याची अंडी देणारी कोंबडी! कमी दिवसात बनाल लखपती

Ajay Patil
Published:
vanraja kombadi

Poultry Farming:- नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्या शेतीला एखाद्या जोडधंद्याची जोड देणे हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता बरेच शेतकरी शेळीपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर पसंती देत असून  कमीत कमी खर्चात देखील चांगले उत्पन्न या माध्यमातून मिळवत आहेत.

तसेच तुम्हाला यामध्ये जर पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल तर अनेक कोंबड्यांच्या जाती देखील आता विकसित करण्यात आल्या असून अशा प्रकारच्या जातींचे पालन करून तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये देखील कुक्कुटपालन व्यवसायातून लाखो रुपये सहज मिळवू शकतात. सध्या भारतामध्ये कोंबड्यांच्या अशा अनेक जाती आहेत ज्या कोंबडी पालनासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

या अनुषंगाने आपण या लेखामध्ये कोंबडीच्या अशाच एका कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्त पैसा मिळवून देईल अशा जाती बद्दलची माहिती घेणार आहोत. कारण ही कोंबडीची जात अंडी आणि मांस उत्पादनासाठी इतर कोंबड्यांच्या जातीच्या तुलनेमध्ये सरस आहे.

 वनराज कोंबडी पाळा आणि लाखोत पैसा मिळवा

वनराज कोंबडीचे पालन हे अंडी आणि मांस उत्पादनासाठी खूप महत्त्वाचे असून या कोंबडीची अंडी आणि मांस अनेक पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे बाजारात देखील चढ्या दराने त्यांची विक्री करणे शक्य आहे. या कोंबडीबद्दल माहिती देताना पशुवैद्यकीय तज्ञ म्हणतात की वनराजा कोंबडी ही देशी जातीची एक कोंबडीची प्रजात असून ती इतर कोंबडींच्या जातीपेक्षा खूप सरस आहे.

या कोंबडीचे पालन करण्यासाठी तुम्ही परसबाग पद्धतीचा वापर करून देखील चांगला नफा मिळवू शकतात. या कोंबडी पालनाची वैशिष्ट्य म्हणजे यावर तुम्हाला जास्त जागा देखील लागत नाही व खर्च देखील जास्त प्रमाणात करावा लागत नाही. वनराजा कोंबडीचे अंडी उत्पादन पाहिले तर ती इतर कोंबड्यांपेक्षा जास्त आहे व महत्त्वाचे म्हणजे तिचा अंडे घालण्याचा कालावधी इतर कोंबड्यांपेक्षा दोन महिने लवकर सुरू होतो.

वनराजा ही कोंबडीची जात डीपीआर हैदराबादने विकसित केलेली असून ही एक विशेष कोंबडीची जात आहे.ही कोंबडी दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते व तिचा रंग तपकिरी असतो. लोकांमध्ये या कोंबडीचे चिकन खूप प्रसिद्ध आहे.

 एका वर्षात देते 120 ते 140 अंडी

वनराज कोंबडी ही इतर कोंबड्यांपेक्षा जास्त प्रमाणात अंड्याचे उत्पादन देते व एका वर्षांमध्ये साधारणपणे 120 ते 140 अंडी घालते. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वनराजा कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम आहे व त्यामुळे ती आजारांना बळी पडत नाही. तिचे वजन देखील खूप वेगात वाढते.

एका पिल्लाचे वजन  35 ते 40 ग्राम असते व 12 आठवड्याचे अंतराने म्हणजे साधारणपणे तीन महिन्याच्या अंतराने 1800 ते 2000 ग्रॅम पर्यंत वजनात वाढ होते. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते ही कोंबडी पाच महिन्यांनी अंडी घालायला सुरुवात करते. तुम्ही जर वनराज जातीची एक किलो वजनाची कोंबडी बाजारात विकली तर तिची किंमत 600 ते 700 रुपयांपर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe