Wheat Farming : मित्रांनो आगामी काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabbi Season) आपल्या देशात सुरवात होणारं आहे. रब्बी हंगामात आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) गहू या पिकाची (Wheat Crop) मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मित्रांनो भारतात पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन घेतले जाते. मात्र असे असले तरी आपल्या महाराष्ट्रातही गव्हाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव गहू या नगदी पिकाची (Cash crops) शेती करत असतात. जाणकार लोक शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगतात की गव्हाच्या शेतीतून चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) करण्यासाठी शेतकरी बांधवांनी नेहमीं गव्हाच्या सुधारित जातींची (Wheat Variety) पेरणी केली पाहिजे. अशा परिस्थितीत आज आपण गव्हाच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या काही सुधारित जाती :-
करण वंदना (DBW 187) ; गव्हाचे हे एक सुधारित वाण आहे. हे वाण ICAR-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन, कर्नाल या संस्थेने विकसित केली आहे. गव्हाची ही जात खासकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळावे यासाठी विकसित करण्यात आली आहे.
जातींचे वैशिष्ट्य – यामध्ये प्रथिने, लोह, जस्त आणि खनिजे यांसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 टक्क्यांपर्यंत असते तर इतर जातींमध्ये प्रथिनांचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यांपर्यंत असते. जाणकार लोकांच्या मते, करण वंदना (DBW 187) हे ईशान्य भारतातील गंगेच्या किनारी प्रदेशासाठी अनुकूल आहे.
पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर-पूर्व मैदानी प्रदेशात बागायती भागात पेरल्या जाणार्या गव्हाची ही नवीनतम जात आहे. या जातीची पेरणी 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करावी, योग्य वेळी पेरणी केल्यास आपण उच्च उत्पन्न मिळवू शकता. 83 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत ही जात उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे.
करण नरेंद्र (DBW 222) :- गव्हाचे हे एक सुधारित वाण आहे. ही जात DBW 222 म्हणून ओळखली जाते. हे उच्च उत्पन्न देणारे गव्हाचे वाण 2022 आणि कर्नालच्या बार्ली संशोधन संस्थेने विकसित केले आहे. गव्हाच्या या सुधारित जातीचा शोध आणि अधिसूचना 2020 मध्ये जारी झाली. इतर वाणांच्या तुलनेत ही जात जास्त उत्पन्न देते, असे केंद्राचे शास्त्रज्ञ सांगतात.
जातीची वैशिष्ट्ये – गव्हाच्या इतर जातींपेक्षा जास्त प्रथिने व्यतिरिक्त, जैविक दृष्ट्या जस्त, लोह आणि इतर अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. या गव्हाची चपाती दर्जेदार बनते. गव्हाची या जातीच्या पेरणीसाठी 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर हा काळ योग्य आहे. ही जात 82 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो. शिवाय ही जात अवघ्या 143 दिवसात काढणीसाठी तयार होत असते.