Wheat Price : सध्या गव्हाचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच गव्हाचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सरकारकडून गव्हाच्या वाढत्या किमतीबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते.
सध्या ग्राहकांना बाजारात गहू 26 ते 27 रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. गव्हाच्या वाढत्या किमती पाहता सरकारकडून गव्हाची खुल्या बाजारात विक्री योजना सुरू केली आहे. मात्र त्याचा भाववाढीवर फारसा काही परिणाम दिसून येत नाही.
गहू महाग होणे ही चिंतेची बाब आहे. कारण केवळ पिठाच्या किमती वाढणार नाहीत तर ब्रेड, बिस्किटे, मैदा, रवा, पास्ता, शेवया इत्यादी पिठापासून बनवलेले पदार्थ देखील महाग होतील. त्यामुळे देशात महागाई वाढतच जाणार आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून गव्हाचे आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
जर बाजारात गव्हाचे भाव कमी झाले नाहीत तर सरकारकडून गव्हाच्या आयात शुल्कामध्ये कपात केली जाऊ शकते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीणा म्हणतात, सध्या आपण बाजारात गहू आणि तांदळाच्या किरकोळ किमतींचा ट्रेंड पाहत आहोत.
खुल्या बाजार विक्री योजनेंतर्गत गहू आणि तांदूळ विक्री करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. गहू आणि तांदळाचे भाव कसे कमी करता येतील यावर आमचे लक्ष आहे. जर सरकारकडून गव्हाचे आयात शुल्क कमी करण्यात आले तर शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
सरकारचे प्रयत्न तीव्र झाले
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीना यांनी सांगितले की त्यानंतरही गहू आणि तांदळाचे दर कमी झाले नाहीत, तर सरकारकडे इतर पर्याय आहेत. यामध्ये आयात शुल्क कमी करण्याचा समावेश आहे.
या सर्व पर्यायांवर सरकार विचार करत आहे. सरकारने उपाय जाहीर करताच अन्नधान्याच्या किमती घसरण्यास सुरुवात होईल, अशी आशा मीना व्यक्त करतात. सध्या गव्हावर ४० टक्के आयात शुल्क आकारले जाते, जे किमती वाढण्यामागचे एक प्रमुख कारण आहे.
सरकारकडून गव्हाची विक्री खुल्या बाजारात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये 15 लाख टन गहू खुल्या बाजारात लिलावाद्वारे विकला जाईल. यातील चार लाख टन गव्हाचा 28 जून रोजी लिलाव होणार आहे.
सरकारकडून आता व्यापाऱ्यांना देखील गव्हाच्या साठ्याची माहिती देण्याची सक्ति केली आहे. आता व्यापाऱ्यांना देखील दर आठवड्याला त्यांच्या साठ्याची माहिती सरकारला द्यावी लागत आहे.
सरकारकडून गव्हाच्या किमती कमी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. सरकारने गव्हाची राखीव किंमत 2150 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. तरीही गव्हाच्या किमती वाढतच आहेत.
गव्हाच्या भावाने चिंता वाढवली
यंदा गव्हाचे उतपादन कमी झाल्याने गव्हाचे भाव वाढतच असल्याचे बोलले जात आहे. अंदाजापेक्षा गव्हाचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. यंदा गव्हाच्या उत्पादनाचा अंदाज 110 दशलक्ष टनांपेक्षा जास्त होता मात्र तो 101 ते 103 दशलक्ष टन इतका असल्याचा अंदाज आहे.
नवी दिल्लीतील गव्हाच्या किमती गेल्या दोन महिन्यांत 10 टक्क्यांहून अधिक वाढून 24,900 रुपये प्रति मेट्रिक टन झाल्या आहेत, ज्यामुळे सरकारने 15 वर्षांत प्रथमच व्यापार्यांकडे असलेला गव्हाचा साठा खरेदी करण्यास प्रवृत्त केले आहे असे सांगण्यात येत आहे.