Guava Farming : पेरू लागवडीसाठी ‘या’ आहेत ५ सुधारित जाती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Guava Farming : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. तसेच देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. सरकारकडून देखील शेतकऱ्यांना प्रोत्सहान देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.

सध्या अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. देशात फळबागांचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. फळबागांची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमावत आहेत.

पेरूची लागवड करून तुम्ही देखील चांगला नफा कमवू शकता. सध्या बाजारात पेरूला देखील जास्त मागणी आहे. तसेच तुम्ही वर्षातून दोन वेळा पेरूचे उत्पादन घेऊ शकता.

पेरूची लागवड उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये आहे. 75 टक्के पेरूचे उत्पादन या 8 राज्यांमध्येच होते.

सध्या देशामध्ये खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामामध्ये तुम्ही पेरूची लागवड करू शकता. तुम्ही पेरूच्या प्रगत जातीची लागवड करून ३० वर्षे नफा कमवू शकता.

खालील पेरूच्या जातींची लागवड करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता

श्वेता

तुम्हालाही पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही श्वेता या प्रगत पेरूच्या जातीची लागवड करू शकता. या झाडाची उंची कमी असते. तसेच पेरू तोडण्यासाठी देखील सोपे असते. तसेच श्वेता या जातीच्या पेरूच्या ६ वर्षाच्या झाडापासून शेतकरी ९० किलोपर्यंत नफा कमवू शकतो. एक फळाचे वजन 225 ग्रॅम पर्यंत असते.

थाई पेरू

थाई पेरूच्या जातीची चर्चा सध्या खूपच आहे. या झाडांना कमी वेळात फळ लागते त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक नफा मिळण्यास सुरुवात होते. तसेच या पेरूची किंमत देखील अधिक आहे. हा पेरू टिकण्याची क्षमता देखील अधिक आहे. त्याचे एक झाड ४ ते ५ वर्षांनी १०० किलो फळे देते.

लखनौ-४९

लखनौ-४९ या पेरूच्या झाडाची उंची लहान असते. मात्र या जातीचे पेरूचे फक्त चविष्ट आणि गोड असते. तसेच उत्पादनाच्या बाबतीत देखील ही पेरूची जात सर्वाधिक उत्पादन देते. याच्या एका झाडापासून 130 ते 155 किलो पेरूचे उत्पादन मिळू शकते.

अलाहाबाद सफेदा

पेरूची लागवड करण्याचा विचार करत असाल तर अलाहाबाद सफेदा हे उत्कृष्ट पेरूचे वाण तुम्ही लावू शकता. या जातीच्या पेरूचे झाड उंच आणि सरळ असते. या झाडापासून तुम्ही 40 ते 50 किलो उत्पादन घेऊ शकता.

पंत प्रभात

पंत प्रभात या पेरूच्या प्रगत जातीपासून तुम्ही एक झाडापासून १२० किलोपर्यंत उत्पादन घेऊ शकता. पंतनगर कृषी विद्यापीठाने हा वाण विकसित केला आहे. त्यामुळे या वाणाची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.