पशू म्हणावे तर त्यांचाही अवमान ठरेल, असे कृत्य पुण्यातील १३ जणांनी केलेय !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- माणसांना पशू म्हणावे तर त्यांचाही अवमान ठरेल, असे कृत्य पुण्यातील १३ जणांनी केले. त्यांना माणूस म्हणावे का, हाच पहिला प्रश्न. या माणसाच्या रूपातील १३ नराधमांनी १४ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर आळीपाळीने सलग दोन दिवस सामूहिक अत्याचार केला. विशेष म्हणजे हे कृत्य करणाऱ्या १३ जणांची नावेच समोर आली आहेत.

मात्र यात आणखी चार ते पाच जणांचा समावेश असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही संतापजनक घटना पुण्यनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात घडली.

मित्राला भेटण्यासाठी बिहारला जाण्यासाठी स्टेशनवर आलेल्या या मुलीने तिकिटासाठी पैसे नसल्याने काही लोकांकडे पैशांची मागणी केली आणि तिला मदत करण्याच्या बहाण्याने १३ नराधमांनी तिची अब्रू लुटली. शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी वानवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, आठ रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे.

मशाक अब्दुलमजिद कान्याल (२७), अकबर उमर शेख (३२), रफिक मुर्तजा शेख (३२), अझरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (२७), प्रशांत सॅम्युअल गायकवाड (३२), राजकुमार रामनगीना प्रसाद (२९), मोईब नईम खान (२४), असिफ फिरोज पठाण (३६) अशी त्यांची नावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe