अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नगर शहरामध्ये रेशनिंगचा गहू व तांदळाचा अवैध साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून,
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि.२४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश श्रीनिवास झंवर ,जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, संदीप पागिरे, सागर अशोक नांगरे, सुरेश रासकर, भगवान छत्तीसे, आदिनाथ चव्हाण यांचा समावेश आहे.
नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात काल कोतवाली व जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रासकर यांच्या दुकान व गोदामावर छापा करून तब्बल ४२ लाखांचा रेशनचा गहू व तांदूळ व वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच मार्केटयार्ड येथील सुरेश ट्रेडिंग कंपनी व केडगाव इंडस्ट्रीज मध्ये असणाऱ्या गोडाऊनला पोलिसांनी सील ठोकले आहे.या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता गहू व तांदूळ तपासणी पोलिसांना करायची आहे.
त्यांनी हा माल कोठून आणला, तो नेमका कोणाकडून आणला आहे याची खातरजमा करायची आहे. कोणाला विकला गेला याचा, या प्रकरणांमध्ये अन्य कोणाकोणाचा समावेश आहे याची सुद्धा पोलिसांना माहिती द्यायची आहे.
त्यामुळे आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद न्यायालयांमध्ये करण्यात आला, न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांना दि.२४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम