अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिग्दर्शक एस. एस. राजामौली आता आपले ड्रीम प्रोजेक्ट आरआरआरवर काम करत आहेत.
अजयने स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. आरआरआर फिल्मच्या वतीने रिलीज करण्यात आलेल्या एका फोटोमध्येही अजय देवगण हा दिग्दर्शक राजमौली यांच्याबरोबर दिसून येत आहे.
ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजय देवगणबरोबर शूटिंग सुरू झाले आहे व सर्व कलाकार या चित्रपटाविषयी खूप उत्साहित आहेत.
या चित्रपटामध्ये बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण व अभिनेत्री आलिया भट्टदेखील आहेत. अजयने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो या चित्रपटामध्ये भगत सिंगच्या भूमिकेत दिसून येणार आहे. अजयने यापूर्वीही भगत सिंगची भूमिका साकारली आहे.
२००२ मध्ये आलेला राजकुमार संतोषीचा चित्रपट द लेजंड ऑफ भगत सिंगमधील शानदार अभिनयासाठी अजय देवगणला राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
My association with @SSRajamouli Sir dates back to 2012. We’ve collaborated in many interesting ways since. Working with him in #RRR is an honour & pleasure. https://t.co/G88HeNAVLG
— Ajay Devgn (@ajaydevgn) January 21, 2020