अहमदनगर लाईव्ह 24 टीम / वृत्तसंस्था :- अमेरिकेतील ओकलामाहोमा येथे गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ओकलामाहोमा येथील एका शिक्षिकेने दोन विद्यार्थ्यांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे. आरोप आहे की, शिक्षिकेने आपल्या दोन विद्यार्थ्यांसोबत जबरदस्ती करुन शारीरिक संबंध ठेवले. या दोन विद्यार्थ्यांपैकी एकाचं वय १८ वर्षे तर दुसऱ्याचं वय १६ वर्षे आहे.
सुरुवातीला आरोपी शिक्षिकेला अटक केले असता तिने या गोष्टीचा इन्कार केला मात्र, नंतर विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं कबूल केलं. आरोपी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं वय २९ वर्षे असून तिचं लग्न झालेलं आहे. या शिक्षिकेवर आरोप आहे की तिने २०१७ आणि २०१९ मध्ये सुट्टीच्या काळात आपल्या दोन्ही विद्यार्थ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवले.
पीडित १८ वर्षीय विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, २०१७ मध्ये या शिक्षिकेने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. दोघे एकमेकांसोबत केवळ मेसेज पाठवत नव्हते तर नग्न फोटोजही शेअर करत होते.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी शिक्षिकेने मान्य केलं की, या विद्यार्थ्यासोबत तीनवेळा शारीरिक संबंध ठेवले. हा विद्यार्थी दोन महिन्यांपूर्वी हायस्कूलमधून ग्रॅज्युएट झाला होता. तर १६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत २०१८ च्या उन्हाळी सुट्टीत आपल्या कारमध्येच शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, एकदा दो शिक्षिकेच्या घरी गेला होता तेव्हा शिक्षिकेने त्याला कंडोम ऑफर केलं होतं. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार, यासंदर्भात फिर्यादीने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शिक्षिकेने सुरुवातीला हे आरोप फेटाळले होते.