अज्ञात व्यक्तीने टाकला कांदा गंजीमध्ये युरिया ! दोनशे क्विंटल कांदा सडण्याची शक्यता

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- आधीच कोरोनामुळे सलग दोन वर्षे शेतात असलेले पिक बाजारपेठ बंद असल्याने विक्री करता आला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आथिर्क संकटात सापडला आहे . आता कुठेतरी कांद्याचे पीक हातात आले आहे. काही दिवस कांदे साठवून ठेवल्याने दोन पैसे हातात पडतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीमध्ये कांदा साठवला आहे.

या चाळीसाठी त्यांनी मोठा खर्च देखील केला आहे. मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कांदा सडण्याच्या हेतूने या कांदा चाळीमध्ये रासायनिक युरिया टाकण्याचा प्रकार केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

या प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी मोहन इंगळे आणि भूमिहीन रमेश इंगळे यांनी बटाईने ३ एकर क्षेत्रामध्ये एकरी ५० हजार रुपये खर्च करून कांदा लागवड केली होती. सदर बटाईतील कांदा भाव वाढतील या अनुषंगाने रमेश इंगळे आणि मोहन इंगळे यांनी गावालगत असलेल्या शेतामध्ये वेगवेगळ्या कांदा चाळीमध्ये कांदा भरून ठेवलेला होता.

परंतु, १६ जून रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने दोन्ही चाळीतील २०० क्विं टल कांद्यामध्ये रासायनिक युरिया खत टाकल्याचे १७ जून रोजी रमेश इंगळे यांच्या लक्षात येताच त्यांनी चांन्नी पोलीस स्टेशनला तक्रार केली.

आलेगाव पोलीस चौकीतील जमादार बाळकृष्ण इंगळे व पोलीस कर्मचारी यांनी सदर घटना स्थळाचा पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीने केलेल्या खोडसाळपणामुळे कष्ट करून पिकविलेला दोनशे क्विं टल कांदा सडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe