अनलॉक होताच सलमान-जॅकलीननं केलं ‘हे’; व्हिडीओ व्हायरल

Published on -

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 :लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला.

परंतु आता लॉकडाऊनचे काही नियम शिथील केल्यानंतर सलमाननं त्याची आवडती कामे करण्यास सुरु केले आहे.

नवी मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर सायकलिंग करतानाचे सलमानचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस सुद्धा दिसत आहे.

सलमान आणि जॅकलिन यांचं काही दिवसांपूर्वीच तेरे बिना हे अल्बम साँग रिलीज झालं होतं जे तुफान चाललं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

या गाण्याची संपूर्ण शूटिंग सलमानच्या फार्म हाऊसवर करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. याशिवाय हे गाणं सुद्धा स्वतः सलमाननं गायलं आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News