अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटनेमध्ये अतिशय वाढ झाली असून, जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावाजवळ असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम कापून चोरट्यांनी त्यामधून २३ लाख ८० हजार ७०० रुपये चोरी केल्याचा घटना घडली आहे.
ही चोरी चोरट्यांनी चक्क युट्युबचा आधार घेऊन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी एमटीम फोडणाऱ्या टोळीला अटक केली असून चौकशी दरम्यान आरोपींनी एटीएमफोडण्यासाठी युटूबवरील व्हिडिओची मदत घेतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील यवत येथील महाराष्ट्र बँकेची एटीएम कापून चोरट्यांनी 23 लाख 80 हजार700 रुपये चोरुन नेले होते. 17 जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता.
या एटीमएम फोडणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून, चौकशी दरम्यान आरोपी अजय रमेशराव शेंडे (वय 32, दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय25,वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय 22, उस्मानाबाद) यांनी सांगितले की, युट्युबवरुन घरफोडी व एटीएम चोरी कशी करायची, याची माहिती त्यांनी गोळा केली होती.
या चोरी साठी लागणारे साहित्य चोरट्यांनी ऑनलाईन मागवले असून हे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपींनी गॅस कटरच्या साहयाने ही चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 लाख रुपये व चोरीची मोटारसायकल, गॅस कटर व इतर साहित्य जप्त केले आहे.
त्याअगोदर 16 जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात आरोपी अजय रमेशराव शेंडे (वय 32, दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय25,वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय 22, उस्मानाबाद) यांना अटक केली असून, चौकशी दरम्यान त्यांनी ही चोरी कशी केली?
याची माहिती पोलिसांना दिली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम