अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे.
नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेला दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने बलात्कार करून गँगरेप केला आहे.

आरोपी मौलाना रज्जब शेख आणि शहाबुद्दीन या दोघांनी पीडित महिलेला काळी जादू उतरवतो असे सांगून जादूटोणा करण्याच्या बहाण्याने तिच्या शरीरावरील कपडे काढून बलात्कार केला आहे.
महिलेने पालघर पोलिस स्टेशन गाठले आणि बलात्कार आणि धमकावल्याबद्दल भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (D) आणि 506 अंतर्गत एफआयआर दाखल केला.
पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोघे आरोपी पळून गेले होते. मात्र त्यानंतर मौलाना रजब शेख (२७) आणि शहाबुद्दीन शेख (५०) या दोघांना अटक करण्यात आली आहे.