अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- देशात येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहे. यात उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या राज्यांसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा देखील समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला असून निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे.
नेमका काय आहे निर्णय? जाणून घ्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना ९० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे.
याआधी ही मर्यादा ७० लाख रुपये इतकी होती. तर दुसरीकडे छोट्या राज्यांमधील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ५४ लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन देखील काढलं असून त्यामध्ये कोणत्या राज्यासाठी खर्चाची किती मर्यादा आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकांमध्येही होऊद्या खर्च लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.
आगामी ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो. विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर लहान राज्यांसाठी ही मर्यादा २० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम