भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे दौऱ्यावर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की झाली होती. यावरून चांगलेच राजकारण तापले होते.

या धक्काबुक्कीत सोमय्या हे जखमी देखील झाले होते. दरम्यान या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका आणि संचिती हॉस्पिटल या ठिकाणांना भेट देणार आहेत. सकाळी 9.40- वाजत ते पुणे दौऱ्यासाठी दिल्लीमधून निघतील.

11 वाजून 30 मिनीटांनी ते पुण्यात पोहचणार आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात धक्काबुक्की झाली होती.

त्यानंतर सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली होती. राज्यपालांनी पुण्यातील घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले होतं. ‘पुण्यातील घटनेसंदर्भात राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.

ते या सगळ्या प्रकरणी राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवणार आहेत. ते गृहमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत.’ तसेच हल्ला करणाऱ्या एकूण 64 जण असून या 64 जणांना अटक करावी, असं किरीट सोमय्या यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe