अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सहकारी साखर कारखान्यांच्या घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव येत असल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते. परंतु तेव्हा माझ्या सारख्या फकीर माणसाचं कोणीच ऐकले नाही. अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.
जरंडेश्वरच्या पार्श्वभूमिवर अण्णा बोलत होते. ते म्हणाले की, ज्या सहकारी कारखान्यांची गैरव्यवहार करून विक्री करण्यात आली, त्याची निःपक्षपातीपणे चौकशी झाली तर मोठे ‘गबाळ’ बाहेर पडेल असे सांगत हजारे म्हणाले,
४९ सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल भावाने विक्री करण्यात आली. संगनमत करून कोणता कारखाना कोणाला द्यायचा याचे नियोजन करण्यात आले. आता माझी एकच विनंती आहे की ईडीने या सर्व कारखान्यांची चौकशी करावी.
आम्हाला कोणत्याही पक्ष अथवा पार्टीचे घेणे देणे नाही. पूर्वी राज्यातील सहकाराचा आदर्श इतर राज्यांनी घेतला होता.आज मात्र राज्यातील सहकार चळवळ हळू हळू मोडकळीस आली असून,
ईडीच्या चौकशीत ४८ कारखान्यांमधील घोटाळा लोकांसमोर येईलच.अजित पवार यांचे या घोटाळयात नाव आहेे, हे मी आम्ही कधीपासून बोलतोय, मात्र फकीर माणसाचं कोण ऎकतय परंतु आता ईडीने लक्ष घातले आहे.
आता सर्व काही बाहेर येेईल असा मला विश्वास मला वाटतो.असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम