अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खा.जोगेंद्रजी कवाडे यांचा बुधवार दि.15 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा दौर्यावन येत असून,
त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थनगर पंचशील विद्या मंदिर शाळेत जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली.
या कार्यक्रमास राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, कार्याध्यक्ष चरणदास इंगोले, प्रा.जयंत गायकवाड आदिंसह नगरमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच विविध शाखांचे उद्घाटन तसेच जिल्ह्यातील अनेक युवक, महिला, कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांच्या उपस्थित होणार आहे.
तरी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते नितीन कसबकेकर, युवक अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, महिला अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, विशाल गायकवाड, शहर जिल्हाध्यक्ष महेश भोसले यांनी केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम