अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- चीनच्या वुहान प्रांतांमधून निघालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला. भारतातही याने उग्र रूप धारण केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही कोरोनाने शिरकाव केला.
आता टिव्ही इंडस्ट्रीतील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अभिनेत्री मोहेना कुमारीला कोरोनाची लागण झाली आहे. मोहोना ही उत्तराखंडचे मंत्री सतपाल महाराज यांची सून आहे.
सतपाल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आणि बाहेरच्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
त्यावेळी मोहेनासोबतच १७ जणांचे रिपॉर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
मोहेनाने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसोबतच सिलसिला प्यार का, प्यार तुने क्या किया, गुमराह यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
ती एक अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. डान्स इंडिया डान्स या प्रसिद्ध कार्यक्रमाचा देखील ती भाग होती.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews