अहमदनगर लाईव्ह 24 टीम / बीजिंग: प्राणघातक कोरोना विषाणूचे ३,२३९ नवीन रुग्ण आढळल्याने जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या तब्बल ७३ हजारांवर पोहोचली आहे.
दरम्यान, जपानच्या समुद्रकिनारी भागात वेगळे ठेवण्यात आलेल्या जहाजावर आणखी ८८ जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण रुग्णांचा आकडा ५४२ इतका झाला आहे. यात सहा भारतीयांचा समावेश असून उपचाराला ते चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे.
कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ग्रस्त असलेल्या हुबेई प्रांतात १,८०७ नवीन रुग्ण आढळल्याने येथील एकूण रुग्णांची संख्या ५९,९८९ इतकी झाली आहे. उर्वरित चीनमध्ये एकूण १,४३२ नवीन रुग्ण आढळले आहेत.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार १,०९७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ११,७४१ रुग्णांची स्थिती नाजूक आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण १२,५५२ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com