अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- जम्मूतील सोपोरमधील गुंड ब्राथ येथे लष्कराच्या जवानांनी रविवारी रात्री केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा
या अतिरेकी संघटनेचा कमांडर मुदसीर पंडित याच्यासह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, अशी माहिती काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली.
काश्मीरमध्ये तीन पोलीस कर्मचारी, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांच्या हत्येमध्ये कमांडर मुदसीर पंडित याचा सहभाग होता.
कारवाई ठार झाला आहे. या कारवाईत ठार झालेल्या एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तो मूळचा पाकिस्तानी असून, असरार उर्फ अब्दुल्ला असं त्यांचं नाव आहे. २०१८ पासून तो उत्तर काश्मिरात सक्रीय होता, असं विजय कुमार यांनी सांगितलं.
लष्कराचे जवान आणि दहशतवादी आमनेसामने आल्यानंतर धुमश्चक्री उडाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.
सुरक्षा जवानांना जोरदार कारवाई करत सुरूवातील एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. त्यानंतरही गोळीबार सुरूच राहिला.
त्यानंतर जवानांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एकूण तीन दहशतवादी या चकमकीत ठार झाले असून, लष्कराची शोध मोहीम सुरूच आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम