अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Kisan Morcha : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपूर्ण देशात किसान संवाद अभियान सुरु केले आहे. या किसान संवाद अभियानअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेविषयी अवगत केले जाणार आहे.
सध्या हे किसान संवाद अभियान (Kisan Samvad Abhiyan) महाराष्ट्रमध्ये सुरु आहे. किसान संवाद अभियानाअंतर्गत बारामती मध्ये (Baramati) चार एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत भाजपा किसान मोर्चाचे (BJP Kisan Morcha) राष्ट्रीय उपाध्यक्ष बन्सीलाल गुर्जर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितले की केंद्र सरकार कृषी क्षेत्राचा जीडीपीमध्ये सहभाग वाढविण्यासाठी वचनबद्ध आहे.
गुजर यांनी सांगितले की, मोदी सरकार (Modi Government) नेहमीच शेतकऱ्यांच्या (Farmer) पाठीशी राहिलेली आहे आणि भविष्यातही शेतकऱ्यांची पाठराखण करणार आहे. गुर्जर यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, गाव तिथे किसान मोर्चा संकल्पना राबविली पाहिजे.
शिवाय गुर्जर यांनी भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांचे तोंड भरून कौतुक केले. याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या कानावर टाकणार आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन देखील दिले.
यादरम्यान, वासुदेव काळे यांनी भाजपा किसान मोर्चाच कार्य भविष्यात देखील याच पद्धतीने अबाधित राहणार असल्याचे प्रतिपादन केले.
काळे यांनी दहा महिन्यांत 35 शेतकरी आंदोलने केली असल्याचा दावा केला शिवाय या आंदोलनात वीज तोडणी, एफ आर पी,पिक विमा, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रमुख मागण्या लावून धरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या भाजपा किसान मोर्चाच्या बैठकी दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय पदाधिकारी उपस्थित होते. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की किसान मोर्चा ने वारंवार राज्यातील शेतकर्यांचा आवाज बुलंद केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा देखील झाला आहे.