Flying Beast फ्लाइंग बीस्ट यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक ! वाढदिवसाच्या दिवशीच झाले असे काही…

Ahmednagarlive24 office
Published:

Gaurav Taneja News: फ्लाइंग बीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या YouTuber गौरव तनेजाला त्याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यासोबत साजरा करणे महागात पडले. नोएडातील पोलिसांनी त्याला कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी सेक्टर 51 मेट्रो स्थानकातून अटक केली आहे.

गौरव तनेजा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी नोएडाच्या सेक्टर 51 मेट्रो स्टेशनवर पोहोचला होता. गौरव तनेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली.

यानंतर गौरव तनेजाच्या चाहत्यांची मोठी गर्दी नोएडा सेक्टर-५१ मेट्रो स्टेशनवर पोहोचली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तनेजाला अटक केली.

गौरव तनेजा व्यावसायिक पायलट, व्यावसायिक बॉडीबिल्डरसह YouTube वर व्लॉगिंग देखील करतो. त्याचे यूट्यूब चॅनल फ्लाइंग बीस्ट नावाने चालते. गौरव तनेजाचे देशभरात हजारो चाहते आहेत. शनिवारी, 9 जुलै रोजी रात्री गौरव तनेजाला नोएडा पोलिसांनी अटक केली.

गौरव तनेजा यांनी मेट्रो स्टेशनवर वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रो रेल्वेची पूर्ण बोगी बुक केली होती. गौरव तनेजा यांची पत्नी रितू राठी हिच्यावर जमाव जमवून पतीचे चाहते बोलावल्याचा आरोप आहे.

गौरव तनेजाचे हजारो चाहते सेक्टर ५१ मेट्रो स्टेशनवर पोहोचले, त्यामुळे तेथील परिस्थिती अनियंत्रित झाली. अशा परिस्थितीत नोएडा सेक्टर 49 च्या पोलिसांना यंत्रणा हाताळण्यासाठी घाईघाईत तेथे पोहोचावे लागले.

त्यावेळी नोएडामध्ये कलम 144 लागू होते, त्यामुळे गौरव तनेजा विरुद्ध कलम 188 अंतर्गत त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वेळातच हे प्रकरण इतकं तापलं की, त्याचा चटका रस्त्यापासून सोशल मीडियापर्यंत पोहोचला. गौरव तनेजा मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर ट्रेंड करू लागला आणि लोक कमेंट करू लागले.

नोएडाच्या मेट्रो प्रशासनाने अलीकडेच वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर समारंभांसाठी मेट्रो स्टेशन किंवा कोच बुक करण्याची सुविधा दिली आहे. गेल्या महिन्यात अनेकांनी आपला वाढदिवस मेट्रोमध्ये साजरा केला.

गौरव तनेजाच्या या घटनेनंतर मेट्रो प्रशासन वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबत मार्गदर्शक तत्त्वे बनवण्याचा विचार करत आहे. विशेषत: सार्वजनिक व्यक्तींसाठी, अशी अनागोंदी निर्माण होऊ नये म्हणून स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe