शिर्डी संस्थान च्या विश्वस्त पदी पत्रकारांना संधी द्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :-  जागतीक दर्जाचे ख्याती असलेले अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थान च्या विश्वस्त पदी जिल्हातुन एका जेष्ठ पत्रकाराची नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे पाटील यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पञाव्दारे मागणी केली आहे.

जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिराच्या विश्वस्त पदाच्या निवडीच्या हालचाली जोरात सुरू आहेत. यामध्ये अनेक राजकीय मंडळींना विश्वस्त पदावर घेतले जाते.परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणार्‍या पत्रकारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते.

तळापासून तर शासनाच्या महत्वाच्या भागापर्यंत पाठपुरावा करण्याची तयारी पत्रकारांची असते आपल्या बातम्या च्या माध्यमातून पत्रकार सतत प्रशासना दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शिर्डीच्या साई बाबाच्या मंदिर संस्थान च्या विश्वस्त पदी जिल्ह्यातील पञकारांचा एक प्रतिनिधी म्हणून शिवाजी शिर्के,

मन्सुसरभाई शेख, भाऊसाहेब येवले,विलास कुलकर्णी, गोरक्षनाथ शेजूळ, संदिप गाडेकर, निसारभाई सय्यद,मनोजकुमार आगे,अशोक गाढेकर, गुरूप्रसाद देशपांडे, विनायक दरंदले,अविनाश मंञी,विनोद गोळे, सुधिर चव्हाण, जनार्दन जगताप,

राजेंद्र जाधव,गणेश जेवरे,नितीन ओझा,राजेंद्र भुजबळ,शिताराम चांडे मिठुलाल नवलाखा,यांपैकी एका पत्रकाराची नियुक्ती करून पञकार प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe