सांगली : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येऊन अडीच वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. विरोधकांनी अनेक वेळा हे आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी केली होती मात्र आजही महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित पणे कामकाज चालवताना दिसत आहे.
महाविकास आघडी मधील नेत्यानं मध्ये अनेक वेळा कुरबुरी होतात. तसेच हा पक्षातील श्रेष्ठ नेत्यांपर्यंतही जातो. त्यावेळी विरोधकांना आघाडी सरकारवर टीका करण्याचे कारण देखील सापडत असते.
हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्या हस्ते इस्लामपूर (islampur) मधील पंचायत समितीतील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या पणाने संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, बाहेर पडला की पाऊस अन् टिव्ही लावला की राऊत असे वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र मात्र हसू पिकले. थोडावेळापुरते वातावरणात आनंद दिसून आला.
या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम , महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे (NCP) वाळवा तालुक्यातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
हसन मुश्रीफ यांनी २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले अनेकांना विधानसभा निवडणुकीनंतर असे वाटले की आमी सत्तेत येणार नाही. मात्र त्यांना असे वाटत असताना आम्ही सत्तेत कसे आलो याचे उदाहरण देखील दिले.