Ayushman Card eligibility : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड जारी केले आहेत. यामुळे त्या कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते.
अनेकांना याबद्दल माहिती नसते. जर तुम्ही अजूनही आयुष्मान कार्ड बनवले नसेल तर वेळ गेलेली नाहीय. परंतु, सर्वात अगोदर तुम्ही या योजनेस पात्र आहात की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल.
अशी तपासा पात्रता
सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आयुष्मान भारत योजनेचे नाव बदलून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ असे केले आहे. या योजनेंतर्गत कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पॅनेलमधील रुग्णालयांमध्ये मोफत मिळतात.
फॉलो करा या स्टेप्स
स्टेप 1
- आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही प्रथम तुमची पात्र आहात की नाही ते चेक पाहिजे.
- पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला आयुष्मान योजनेच्या अधिकृत पोर्टल http://pmjay.gov.in वर जावे लागेल.
स्टेप 2
- पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे टाका
- आता तुमच्यासमोर दोन पर्याय येतील, एक म्हणजे तुम्हाला तुमचे निवासी असलेले राज्य निवडायचे आहे.
स्टेप 3
- दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल.
- या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतेबद्दल समजेल.