‘ह्या’ 10 टिप्स वापराल तर खराब होणार नाही तुमचे शिल्लक राहिलेले अन्न

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  घरात तयार केलेले अन्न सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान असते. कधीकधी घरात आवश्यकतेपेक्षा थोडे अधिक अन्न तयार केले जाते. अशा परिस्थितीत, ते अन्न पुन्हा खाण्यासाठी, ते खराब होणार नाही याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.

विशेषत: लक्ष न दिल्याने अन्न खराब होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपणास हे अन्न खराब नये यासाठी अनेक प्रभावी टिप्स सांगणार आहोत.

  • – स्वयंपाक केल्याच्या 2 तासांच्या आत अन्न खावे.
  • – जर बराच काळ अन्न बाहेर ठेवले तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात ज्यामुळे अन्न खराब होऊ लागते.
  • – जेवण शिल्लक राहिल्यास त्वरित फ्रीजमध्ये ठेवणे चांगले.
  • – जर फ्रीज नसेल तर भांड्यात पाणी घाला आणि त्यावर हे भांडे ठेवा
  • – बाळासाठी नेहमीच ताजे अन्न तयार करा.
  • – उरलेले अन्न नेहमी जुन्या भांड्यातून बाहेर काढून नव्या पात्रात ठेवा.
  • – खूप गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवू नये. ते थंड करून फ्रीजमध्ये ठेवा.
  • – एका दिवसापेक्षा जुने अन्न खाऊ नका.
  • – उरलेले पदार्थ नव्याने बनवलेल्या पदार्थात मिसळून खाऊ नका.
  • – पुन्हा पुन्हा अन्न गरम करू नका. यामुळे त्याचे पोषण कमी होते.