Indian Railways Update : आता तुम्हालाही मिनिटात ट्रान्सफर करता येईल तुमचे रेल्वेचे तिकीट, जाणून घ्या नवीन नियम

Ahmednagarlive24 office
Published:
Nashik Pune Railway

Indian Railways Update : देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु प्रवास करण्यासाठी प्रवाशांना गरजेचे असते ते म्हणजे रेल्वेचे तिकीट. जर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नसेल तर तुम्हाला रेल्वेने प्रवास करता येत नाही.

जर प्रवासी तिकीट नसताना प्रवास करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. ही कारवाई दंडाच्या स्वरूपात असते. अनेकदा या तिकिटांद्वारे प्रवाशांना प्रवास करायचा नसतो त्यामुळे ते तिकीट ट्रान्सफर करतात. परंतु अनेकांना तिकीट ट्रान्सफर कसे करावे ते माहिती नसते.

अगोदरच द्यावी लागणार माहिती

त्यासाठी तुम्हाला रेल्वे सुटण्याच्या अगोदर म्हणजे 24 तास आधी विनंती करावी लागणार आहे. यानंतर, तिकिटावर प्रवाशाचे नाव क्रॉस आउट करण्यात येते. तसेच ज्या सदस्याच्या नावावर तिकीट हस्तांतरित करण्यात येते त्यावर त्याचे नाव टाकण्यात येते.

मिळते केवळ एकदा संधी

भारतीय रेल्वेचे याबाबत असे म्हणणे आहे की प्रवाशांना एकदा तिकीट ट्रान्सफर करण्यात येते, म्हणजे जर एखाद्या प्रवाशाने एकदा त्याचे तिकीट दुसर्‍या व्यक्तीकडे ट्रान्सफर केले, तर ते त्याला बदलता येत नाही.

लग्नाला जाणाऱ्या लोकांसमोर अशी परिस्थिती निर्माण झाली तर लग्न आणि पार्टीच्या आयोजकांना आवश्यक कागदपत्रांसह 48 तास अगोदर अर्ज करावा लागतो. तसेच ही सुविधा तुम्हाला ऑनलाइन मिळते. हीच सुविधा एनसीसी कॅडेट्सनाही मिळते.

तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • तुमच्या तिकिटाची प्रिंट काढा.
  • तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनच्या आरक्षण काउंटरवर जा.
  • ज्यांच्या नावावर तिकीट हस्तांतरित करायचे आहे त्याचा आधार किंवा मतदान ओळखपत्र यांसारखे ओळखपत्र घ्यावे लागणार आहे.
  • आणि त्यानंतर काउंटरवर तिकीट हस्तांतरणासाठी अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुमचे तिकीट दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होऊ शकते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe