कापूस लागवड करताना एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन हवे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कापूस लागवड करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक शिवाजी कोरडे यांनी केले.

वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत यावेळी शेतकऱ्यांना शेतीशाळेत ते बोलत होते.

कृषी सहायक चंद्रकांत म्हसे यांनी खताची बचत, सोयाबीन पिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहायक कृषी अधिकारी भीमराज गडधे, मंगेश बनकर, आकाश गोरे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,

सदस्य अशोकराव खुळे, अशोकराव कुलट, माजी सरपंच बाबासाहेब खुळे, दत्तात्रय खुळे, ज्ञानेश्वर खुळे, युनूस शेख, सारंगधर खुळे, अर्जुन आढाव, बाळासाहेब खुळे, बाबासाहेब मकासरे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News