Indian Railways : अनेकजण रेल्वेने (Railway) प्रवास करतात. काही वेळेस प्रवाशांना आपले तिकीट दुसऱ्यांना ट्रान्सफर (Ticket Transfer) करायचे असते. परंतु, हे तिकीट दुसऱ्यांना कसे ट्रान्सफर करायचे हेच माहित नसते.
प्रवाशांना आता आपले तिकीट दुसऱ्यांना ट्रान्सफर (Transfer) करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना (Railway Passengers) भुर्दंड सहन करावा लागणार नाही.

भारतीय रेल्वेने (Indian Railways) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कोणताही प्रवासी त्याचे कन्फर्म ट्रेन तिकीट (Confirmed Train Ticket) दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकतो. हे परिपत्रक भारतीय रेल्वेने काही वर्षांपूर्वी जारी केले होते.
परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर एखादी व्यक्ती स्वत:च्या रेल्वे तिकिटावर प्रवास करत नसेल. या प्रकरणात, तो त्याचे तिकीट कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे हस्तांतरित करू शकतो.
यासाठी प्रवाशांना स्टेशन मास्टरकडे (Station Master) अर्ज द्यावा लागणार आहे. अर्जासोबत, प्रवाशाला रेल्वे तिकिटाची प्रत, आयडी प्रूफ आणि ज्या व्यक्तीच्या रेल्वे तिकिटावर तुम्ही आज प्रवास करत आहात. त्याच्यासोबत रक्ताच्या नात्याचा पुरावाही द्यावा लागणार आहे.
यानंतर रेल्वे अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करतील. तुमच्या अर्जात कोणतीही चूक नसल्यास तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या रेल्वे तिकिटावर प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.