“कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है” जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना शायरीतून टोला

Content Team
Published:

बीड : शिवसेना (Shivasena) नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यामधील टीका सत्र सतत सुरूच असते. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सतत कशा ना कशावरून तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु असतात.

शिवसेना नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे (Amar Naikwade) यांनी संदीप क्षीरसागर यांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले आहेत की, आमदार संदीप क्षीरसागर यांनी धमक असले तर किमान स्वत:च्या गावात रस्ता आणून दाखवावा.

काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीप क्षीरसागर यांना शायरीतून खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, ‘सुबह का भूला शाम को घर आ जाए, तो उसे भूला नहीं कहते, असं शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

प्रवेशाचा राष्ट्रीय महामार्ग सुरू राहील, असंही ते यावेळी म्हणालेत. दरम्यान, ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’, असं म्हणत त्यांनी आमदार संदीप क्षीरसागरांवर टीका केलीय. तर यावेळी बोलताना, कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है, असा टोला त्यांनी संदीप क्षीरसागरांना लगावलाय.

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर (Bharat Kshirsagar) यांनीही संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, हे पाच पांडव आमच्या घरात होते. मात्र, आमचं घर फुटल्यानंतर ते त्या घरी गेले.

आज पुन्हा आमच्या घरात आले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना केवळ शिवसेनेच्या नगरपरिषदेचा निधी देण्यात येत नाही.

शिवसेनेचं काही चुकत आहे का? आम्ही आणलेल्या निधीचा इथले आमदार श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी 35 वर्ष नगराध्यक्ष आहे. मी कधीच आमदार व्हायचं म्हंटलं नाही.

पदासाठी रक्ताचं नातं तोडलं. माझ्यात विष कालविण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांचा हा जनसागर आहे. काकू नाना यांनी आम्हाला बेरजेचं राजकारण शिकविलं आहे. असेही ते म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe