जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वाढला बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुणतांबा फाटा परिसरात आबनाबे वस्तीजवळ नगर मनमाड हायवे पास करत असताना राहुल दहिवाड, कैलास वाघ, वसंत त्रिभुवन, देवा लोखंडे यांना बिबट्या रस्ता क्रॉस करत असताना आढळून आला.

प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या मोटारसायकली रस्त्यावर चालू ठेवून लाईटचा प्रकाश वाढवत हॉर्न वाजवत राहिले. त्यामुळे रस्ता क्रॉस करत असताना बिबट्याने कोणाला त्रास देणार नाही.

दरम्यान गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News