वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी ! वाहनांची फिटनेस तपासणी करणे होणार अनिवार्य

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकार पुढील वर्षापासून सर्व वाहनांची फिटनेस तपासणी करणे अनिवार्य करणार आहे.

यासाठी एप्रिल 2023 पर्यंत नवीन ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स (ATS) तयार केले जातील, जे खाजगी कंपन्याद्वारे चालवले जातील. दरम्यान या एटीएसमार्फत वाहनांची फिटनेस चाचणी अनिवार्य करण्याची योजना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

एटीएसमध्ये वाहनांची फिटनेस तपासणी विविध तांत्रिक उपकरणांच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने केली जाणार आहे. तसेच 1 जून 2024 पासून मध्यम आकाराची वाहने, प्रवासी वाहने आणि लहान मोटार वाहनांसाठी ही फिटनेस चाचणी अनिवार्य आहे.

गेल्या वर्षी केंद्राच्या वाहन भंगार धोरणानंतर ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार 15 वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी आणि 20 वर्षे जुन्या खासगी वाहनांसाठी फिटनेस चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

8 वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांच्या फिटनेस चाचणीनंतर नूतनीकरण प्रमाणपत्र दिले जाईल. मात्र, यापेक्षा कमी वाहनांसाठी एक वर्षाचा कालावधी असेल.

एवढी वाहने विना फिटनेस टेस्ट सर्टिफिकेट :- देशात 51 लाख हलकी मोटार वाहने आहेत, जी 20 वर्षापेक्षा जुनी आहेत. तसेच 34 लाख वाहने 15 वर्षापेक्षा जुनी आहेत.

अंदाजे 17 लाख मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहने 15 वर्षांहून अधिक जुनी आहेत, ज्यांच्याकडे वैध फिटनेस चाचणी प्रमाणपत्रे नाहीत. याबाबतची माहिती परिवहन मंत्रालयाच्या आकडेवारीमध्ये दिसून येत आहे.