LIC Policy : व्वा! घरबसल्या 9 लाख रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक

Published on -

LIC Policy : एलआयसीच्या सर्वच योजना ग्राहकांसाठी खूप फायदेशीर असतात. कंपनीच्या या योजनेत कोणत्याही जोखीम घ्यावी लागत नाही तर त्यांना चांगला परतावाही मिळतो. त्यामुळे देशभरातील लाखो लोक या योजनेचा लाभ घेताना आपल्याला दिसत आहेत.

अशाच एका योजनेची सध्या चर्चा सुरु आहे. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला घरबसल्या एकूण 9 लाख कमावण्याची संधी मिळेल. परंतु जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर योजना.

LIC ही देशातील सगळ्यात मोठी विमा कंपनी आहे. कंपनीने ग्राहकांना श्रीमंत करण्यासाठी SIIP ही युनिट-लिंक्ड विमा पॉलिसी आणली असून यात जोखमीच्या आधारावर, इक्विटी तसेच डेट फंडाचा पर्याय निवडण्याची संधी देत आहे. तसेच ही पॉलिसी ग्राहकांच्या कुटुंबाला कव्हरेज देत आहे. ही पॉलिसी ग्राहकांच्या पैशाचे मोठ्या फंडात रूपांतर करण्यास मदत करेल. परंतु, या पॉलिसीसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, ज्यांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.

जाणून घ्या अटी

कंपनीच्या SIIP पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी, पॉलिसी धारकांचे वय कमीत कमी 90 दिवस म्हणजे 3 महिने असावे. तसेच जास्तीत जास्त वय 65 वर्षे असावे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 ते 25 वर्षे लागत असून ज्यात वार्षिक प्रीमियम 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी 10 पट तसेच 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कमीत कमी रकमेच्या 7 पट गुंतवला जातो.

जाणून घ्या फायदे..

या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकांना खूप फायदे मिळत आहेत. ज्यात, पॉलिसी धारकांच्या मृत्यूनंतर, मॅच्युरिटीच्या हमीसह परतावा प्राप्त मिळतो. तर दुसरीकडे, समजा पॉलिसीधारक कोणत्याही प्रकारची जोखीम सुरू होण्यापूर्वी मरण पावला, तर त्याच्या नॉमिनीला मृत्यूपूर्वी संपूर्ण रक्कम देण्यात येते.

समजा एखाद्या व्यक्तीने या पॉलिसीमध्ये 10 वर्षांसाठीही पॉलिसी घेऊन त्यात त्याने 50000 रुपये गुंतवल्यास त्याला या पॉलिसीवर 10% व्याज मिळू शकते. 10 वर्षानंतर संपूर्ण पैसे 9,39,700 रुपयांमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे या गुंतवणूकदाराला अवघ्या 50000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 9 लाखांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe