Duplicate Pan Card : प्रत्येक व्यक्तीसाठी त्यातही खासकरुन नोकरी करणाऱ्यांना पॅनकार्ड खूप गरजेचे आहे. परंतु,अनेकदा एखाद्याचं पॅनकार्ड हरवले जाते. त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागतो.
बऱ्याचदा अनेकांचे पॅनकार्ड नसल्यामुळे आर्थिक व्यवहार खोळंबतात.जर तुमचेही पॅनकार्ड हरवले असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही ते परत मिळवू शकता.

असे बनवा डुप्लिकेट पॅन कार्ड
स्टेप 1
- जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्हाला आयकर पॅन सर्व्हिसेस युनिटच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- येथे तुम्हाला रीप्रिंट पॅन कार्ड पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 2
- त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म मिळेल, त्यावर तुमची सर्व माहिती भरा.
- येथे बनवलेल्या कोणत्याही बॉक्सवरील चेक मार्कवर क्लिक करू नका
- तुम्हाला 105 रुपये (कोणताही बदल नसल्यास) फी भरावी लागेल.
स्टेप 3
- त्याची प्रिंट घेऊन त्या फॉर्मवर तुमचा फोटो लावून फक्त एक सही करायची आहे.
- तुम्ही ज्या मोडद्वारे पेमेंट केले आहे त्याचीही एक प्रत जोडा.
स्टेप 4
- यानंतर तुम्हाला ते NSDL च्या पुणे कार्यालयात पाठवावे लागणार आहे
- सोबत, तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा, जसे की 10वीचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र इ. पाठवावे लागेल.
- 15 दिवसांच्या आत, तुमचे पॅन कार्ड तयार होते आणि ते तुमच्या पत्त्यावर येते.