नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ‘या’ बँकेच्या अध्यक्षपदी निवड

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज गुरुवारी (दि. २०) झाली. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.

मुश्रीफ हे अध्यक्षपदी विराजमान झाले तर काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपाध्यक्षपदासाठी उत्सुकता लागून राहिली होती. अखेर याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, सत्तारूढ आघाडीची सकाळी ११ वाजता बैठक झाली. यामध्ये हसन मुश्रीफ आणि राजूबाबा आवळे यांची नावे निश्चित झाली.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे आघाडीअंतर्गत पाडापाडीबद्दल आपली स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांसमोर मांडतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

त्यामुळे आघाडीच्या बैठकीत वातावरण तापले होते. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला १८, तर विरोधी आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe