Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. परंतु, अनेकजण आजही चाणक्य नीति आवडीने वाचतात. चाणक्य नीतिमधील गोष्टी पाळल्या तर त्या व्यक्तीला जीवनात खूप यश मिळते.
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति या पुस्तकात स्त्रियांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात या स्त्रिया असतील तर त्या व्यक्तीचे घरच उध्वस्त होते. जाणून घेऊयात याविषयी.

लक्षात ठेवा या गोष्टी
हे लोक असतात भाग्यशाली
ज्या व्यक्तींची पत्नी गोड बोलणारी, सुंदर आणि धनसंचय करणारी आहे, ते लोक खूप भाग्यशाली असतात. जेव्हा त्यांच्या घरात कोणतेही संकट येते तेव्हा ते भाग्यात रुपांतर होते.
सांगू नका तुमची कमजोरी
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कधीही पत्नीसमोर आपली कमजोरी सांगू नये. कारण ती तिच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ब्लॅकमेल करू शकते.
महिलांमध्येही शक्ती असते
जसे राजांचे सामर्थ्य हे त्यांचे सैन्य, ब्राह्मणांचे सामर्थ्य हे ज्ञान आणि ब्रह्मविद्या असते. तसेच स्त्रियांचे सामर्थ्य त्यांचे रूप, शील, तारुण्य आणि वाणी आहे. याचा वापर करून ते त्यांना पाहिजे ते मिळवू शकतात.
कधीही शेअर करू नका या गोष्टी
कधीही आपल्या अपमानास्पद गोष्टी पत्नीसोबत शेअर करू नयेत. कारण या गोष्टींमुळे महिलांचा अपमान होऊ शकतो.
सतत भांडण करणाऱ्या महिलांपासून लांब राहा
चाणक्य यांच्या मतानुसार ज्या स्त्रिया कठोरपणे बोलतात, भांडतात आणि इतरांना अपमानित करणाऱ्या स्त्रियांसोबत राहणे किंवा त्यांच्याशी संबंध ठेवणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा स्त्रिया आपले घर उध्वस्त करतात.